श्रेया घोषालचा हा VIDEO पाहून तुम्हालाही लागेल तिच्या आवाजाचं याड!

श्रेया घोषालचा हा VIDEO पाहून तुम्हालाही लागेल तिच्या आवाजाचं याड!

श्रेया घोषालचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 ऑक्टोबर : गायिका श्रेया घोषाल हे बॉलिवूडमधील एक महत्त्वाचं नाव मानलं जातं. आतापर्यंत श्रेयानं हिंदी, मराठी आणि बंगाली या भाषांमध्ये अनेक गाणी गायली आहेत. तिच्या आवजाचे अनेकजण वेडे आहेत. त्यामुळेच तिचा कोणताही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. काही दिवसांपूर्वी श्रेयाचा पियानोच्या साथीनं गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता तिनं तिच्या फेसबुक आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये श्रेया घोषाल ‘मैं तेरी नजर का सुरुर हूँ...’ हे गाणं गाताना दिसत आहे. या गाण्याचं विशेष म्हणजे श्रेयांनं कोणत्याही म्युझिकशिवाय हे गाणं गायलं आहे. हा व्हिडीओ 4 लाखांहून जास्त लोकांनी पाहिला असून 2 लाखांहून जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

नाणं एकदम खणखणीत वाजतंय! गॉडफादर नसतानाही 'या' स्टार्सनी गाजवलं बॉलिवूड

श्रेयाच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर सर्वांना अक्षरशः वेड लावलं आहे. कोणत्याही म्युझिकशिवाय सुद्धा श्रेयाच्या आवाजानं कमाल केली आहे. काही दिवसांपूर्वी 'आज जाने की जिद ना करो' हे गाणं गायलं होतं. या गाण्यानं सुद्धा सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला होता.

शाहरुख-आमिरच्या स्टारडमला धोका! 'हे' नवे चेहरे चढतायत वरचढ

दीपिका सांगणार द्रौपदीच्या नजरेतून महाभारत, पुरुष पात्रांबद्दल म्हणाली...

=======================================================

VIDEO : 'कन्येचा पराभव शिवसेनेला राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यामुळे', खडसेंचा आरोप

Published by: Megha Jethe
First published: October 25, 2019, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading