Home /News /entertainment /

अग्गंबाई सासूबाई : रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर हा अभिनेता साकारणार आजोबांची भूमिका

अग्गंबाई सासूबाई : रवी पटवर्धन यांच्या निधनानंतर हा अभिनेता साकारणार आजोबांची भूमिका

ए चप्पलचोर, सोम्या कोंबडीच्या हे संवाद अग्गंबाई सासूबाई या मालिकेत पुन्हा ऐकायला मिळणार आहेत.

  मुंबई, 01 जानेवारी: अग्गंबाई सासूबाई (Aggbai Sasubai) या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक ‘आसावरी (Nivedita Saraf), अभिजित (Girish Oak), शुभ्रा (Tejashree Pradhan) आणि बबड्या (Ashutosh Patki) ’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. बबड्याला त्याने केलेल्या चुकांची जाणीव झाली आहे आणि आता तोदेखील आईची मनधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या टीमला एक धक्का पचवावा लागला होता. तो धक्का बसला ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनामुळे. आधी ज्येष्ठ कलाकारांना सेटवर परवानगी नसल्यामुळे आणि नंतर रवी पटवर्धन यांच्या निधनामुळे बरेच दिवस मालिकेत आजोबांचा ट्रॅक दिसला नव्हता. पण आता अग्गंबाई सासूबाई या मालिकेत पुन्हा एकदा सोम्या, कोंबडीच्या, ए चप्पलचोर हे संवाद ऐकायला मिळणार आहेत. कारण मोहन जोशींच्या रुपाने मालिकेत नव्या आजोबांची एन्ट्री होणार आहे.
  ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांनी आजोबांची भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली होती. मुख्य कलाकारांप्रमाणेच रवी पटवर्धन यांच्या आजोबांच्या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यांच्या निधनामुळे मालिकेच्या टीममध्येही एक पोकळी निर्माण झाली होती. पण आता जुन्या आठवणी मनात ठेवत नवी सुरुवात करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 4 जानेवारीपासून आपल्याला मोहन जोशी नव्या आजोबांच्या रुपात पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे ए चप्पलचोर हा संवाद मिस करत असाल तर थोडी कळ काढा तुम्हा हाच संवाद वेगळ्या ढंगात ऐकायला मिळणार आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Marathi entertainment, Serial

  पुढील बातम्या