राधे चित्रपटातील गाणं कॉपी केल्याचा आरोप; निर्माते ट्रोलर्सच्या निशाण्यावर

राधे चित्रपटातील गाणं कॉपी केल्याचा आरोप; निर्माते ट्रोलर्सच्या निशाण्यावर

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (salman khan) आगामी चित्रपट 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई'चा ट्रेलर ('Radhe: Your Most wanted Bhai' trailer) नुकताच प्रदर्शित झाला आहे. दरम्यान काहींनी सलमानला ट्रोल केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा (salman khan) आगामी चित्रपट 'राधेः युवर मोस्ट वॉन्टेड भाई'चा ट्रेलर  ('Radhe: your most wanted bhai' trailer) नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला सलमानच्या चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील गाणं युट्युबवर (Youtube) प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासातच हे गाणं सोशल मीडियावर ट्रेन्ड झालं आहे. यावरून चाहते भाईजानच्या या चित्रपटाची किती उत्सुकतेनं वाट पाहात होते, हे लक्षात येतं.

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी सलमान खानवर चित्रपटातील गाणं कॉपी केल्याचा आरोपही केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खान आणि दिशा पाटनी 'सीटी मार' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. नेटकऱ्यांच्या मते, निर्मात्यांनी हे गाणं दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या 'डीजे' चित्रपटातील गाण्याची कॉपी केली आहे. या गाण्यावरून नेटकरी YouTube सोबतचं, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया अकाऊंटवर निर्मात्यांना ट्रोल करत आहेत.

नेटकऱ्यांनी ट्रोल करताना म्हटलं की, पूर्वी बॉलिवूडची लोकं फक्त कथेची कॉपी करायचे, परंतु आता त्यांनी गाण्याची कॉपीही करायला सुरुवात केली आहे. निर्मात्यांनी किमान थोडा तरी बदल करायला पाहिजे होता. पण निर्मात्यांनी सर्वकाही सारखंच  ठेवलं आहे. दुसरीकडे एका व्यक्तीनं बॉलिवूडच्या वतीनं अल्लू अर्जुनची माफी देखील मागितली आहे.

(वाचा- लॉकडाऊनमध्येही सलमान खान जिममध्ये गाळतोय घाम, जॅकलीननं शेअर केला PHOTO)

त्याचवेळी दुसर्‍या एका वापरकर्त्यानं म्हटलं की, हे गाणं गायकांमुळे नव्हे, तर डान्सरमुळे (सलमान खान) फ्लॉप होईल. या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त दिशा पाटनी (Disha Patani) देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे, रणदीप हूडादेखील या चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहे. 'राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच 13 मे रोजी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण देशात सध्या कोरोना लॉकडाऊनचं सावट असल्यानं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी होऊ शकेल, याबाबत प्रश्नचिन्हचं आहे.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 6:31 PM IST

ताज्या बातम्या