• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Sneha wagh मुळे Bigg Boss Marathi 3 वादात; 'तो' व्हिडिओ पाहून भडकले प्रेक्षक

Sneha wagh मुळे Bigg Boss Marathi 3 वादात; 'तो' व्हिडिओ पाहून भडकले प्रेक्षक

अभिनेत्री स्नेहा वाघच्या (Sneha Waghs) व्हिडीओमुळे बिग बिग बॉस (Bigg Boss Marathi 3) शोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

 • Share this:
  मुंबई, 02 ऑक्टोबर : सध्या सगळीकडे बिग बिग बॉस (Bigg Boss Marathi 3) मराठीच्या सीझन तीनची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या सीझनमधील स्पर्धक मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघने (Sneha Wagh) काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली हो. या पोस्टमुळे स्नेहा पुन्हा चर्चेत आली आहे. कारणही तसंच आहे कारण या पोस्टमुळे प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. स्नेहाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी स्नेहासोबत शोवर देखील टीकेची झोड उठवली आहे. स्नेहा वाघ या व्हिडिओत ‘गॉसिप अँड किचन फाईट’ असे कॅप्शन देऊन बिग बॉसच्या घरातील घडामोडींबद्दल सांगत आहे. मात्र तिने काढलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? बिग बॉसच्या घरात राहून व्हिडिओ शूट कसा केलास? तू बिग बॉसच्या घरात राहून इंस्टाग्रामवर कशी काय वापरतेस ? तू बिग बॉसच्याच घरात आहेस ना? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. तसेच स्नेहाच्या या व्हिडिओमुळे बिग बॉसचा शो स्क्रिप्टेड आहे आणि म्हणून तो आम्हाला फेक वाटतो अशा काहीशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहे.
  स्नेहा वाघच नाही तर बिग बॉसच्या घरातील सर्वच सदस्य सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील प्रत्येक अपडेट त्यांच्या अकाउंटवर पाहायला मिळत असतात. या स्पर्धकांचे सोशल मीडिया अकाउंट त्यांची टीम चालवत आहे. त्यांच्या अकाउंटवरून देखील या शोमध्ये पुढे काय होणार, हा स्पर्धक कसा खेळतो या व बिग बॉसच्या घरासंबंधी अपडेट मिळत असतात. हे वाचा - Jeev Majha Guntala : अंतराने बदललं आपलं रूप; आता तरी तिच्यात गुंतणार का मल्हारचा जीव?; पाहा PHOTOS 'काटा रुते कुणाला' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री स्नेहा आणि अनेक मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता आविष्कार यांचं लग्न झालं होतं. वयाच्या 19 व्या वर्षी स्नेहाने आविष्कारासोबत विवाह केला होता. परंतु, अवघ्या काही वर्षातच ते एकमेकांपासून वेगळे झाले. स्नेहाने आविष्कारवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. शांतपणे सगळं सहन करण्याऐवजी स्नेहाने तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. अखेर आविष्कार आणि स्नेहा यांनी घटस्फोट घेतला. आता हे दोघे पुन्हा या शोच्या निमित्ताने एकत्र आले आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: