News18 Lokmat

सिंबा पाहून रणवीरच्या बायकोनं दिली 'ही' प्रतिक्रिया

सगळीकडे सिंबा रिलीज झाला. प्रेक्षक, समीक्षक यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतायत. पण महत्त्वाची प्रतिक्रिया होती ती रणवीरच्या होम मिनिस्टरची.

News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2018 11:45 AM IST

सिंबा पाहून रणवीरच्या बायकोनं दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई, 28 डिसेंबर : आज ( 28 डिसेंबर ) सगळीकडे सिंबा रिलीज झाला. प्रेक्षक, समीक्षक यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतायत. पण महत्त्वाची प्रतिक्रिया होती ती रणवीरच्या होम मिनिस्टरची. लग्नानंतरचा रणवीरचा हा पहिलाच सिनेमा.

रणवीर सिंग आपल्या अख्ख्या टीमला घेऊन सिंबा पाहायला पोचला होता. त्यात दीपिकाही होती. नंतर मीडियाशी बोलताना रणवीरला विचारलं, दीपिकाला सिनेमा कसा वाटला? त्यावर रणवीर म्हणाला, माझ्या बायकोला रोहित शेट्टीबरोबर माझाही अभिमान वाटला.

रणवीर म्हणाला, की सिनेमा संपल्या संपल्या दीपिकानं रोहितचं अभिनंदन केलं. रणवीर-दीपिकाच्या लग्नानंतर रणवीर सिंबाच्या प्रमोशनमध्ये बिझी झाला. त्यामुळे ते हनिमूनला जाऊ शकले नाहीत.

सिंबाचं शूटिंग हैदराबादला झालं. सिनेमात मराठी कलाकारांची फौज आहे.सिद्धार्थ जाधव संतोष तावडेची भूमिका साकारतोय. हा संतोष पोलीस आहे. सिंबाचा चेला आहे. सिद्धार्थला सेटवरचा अनुभव तर अविस्मरणीय ठरला.'मी रोहितसरांबरोबर गोलमाल सिनेमा केला होता. आता 13-14 वर्षांनी पुन्हा सिंबा केला. पण एक सांगतो रोहित शेट्टी माणूस म्हणून अजिबात बदलले नाहीत.' सिद्धू अभिमानानं सांगत होता.

शूटिंगच्या वेळी रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांच्या सूचना आणि शाॅट चांगला झाला तर कौतुक सिद्धार्थला मिळायचं. सेटवर तर त्याला खूप चांगले अनुभव आले. तो सांगतो, ' एकदा एका रात्री महत्त्वाचा सिन शूट होणार होता. अचानक पाऊस सुरू झाला. पण रोहित सर म्हणाले पाऊस थांबेपर्यंत आपणही वाट पाहू आणि मग काय, सेटवर एकच मैफल जमली. रणवीरनं स्पीकरवर गाणं सुरू केलं. सारा गायला लागली. एकच धमाल आली.'

Loading...


Year Ender 2018 : सोयराबाई साकारताना स्नेहलताला मन घट्ट करावं लागतं कारण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 28, 2018 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...