Home /News /entertainment /

Trolling नंतर नवीन गाणं रिलीज होताच गोविंदानं पहिल्यांदा केला कमेंट सेक्शन ऑफ ! भाचा कृष्णा म्हणाला..

Trolling नंतर नवीन गाणं रिलीज होताच गोविंदानं पहिल्यांदा केला कमेंट सेक्शन ऑफ ! भाचा कृष्णा म्हणाला..

गोविंदाने 13 जानेवारीला ‘मेरे नाल’ (Govinda new song Mere Naal) हे गाणं रिलीज केलं आहे. आता गोविंदाने त्याचं हे नवं गाणं रिलीज केल्यानंतर यूट्यूबवरील (YouTube) या म्युझिक व्हिडिओचा कमेंट सेक्शन बंद केला आहे.

    मुंबई, 15 जानेवारी- बॉलिवूडचा हिरो नंबर 1 म्हणून अभिनेता गोविंदाला ओळखले जाते. गोविंदाने 13 जानेवारीला ‘मेरे नाल’ (Govinda new song Mere Naal) हे गाणं रिलीज केलं आहे. आता गोविंदाने त्याचं हे नवं गाणं रिलीज केल्यानंतर यूट्यूबवरील (YouTube) या म्युझिक व्हिडिओचा कमेंट सेक्शन बंद केला आहे. गोविंदाने असं का केलं असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मात्र नुकतंच गोविंदाचे हॅलो हे गाणे प्रदर्शित झाले होते. या या गाण्यातील त्याच्या डान्स स्टाईलमुळे त्याला ट्रोल केले जात होते. या ट्रोलिंगला कंटाळून त्यांनी या गाण्याचा कमेंट सेक्शन बंद केला होता. यामुळे ‘मेरे नाल’ या गाण्याबात देखील गोविंदाने तोच निर्णय घेतला आहे. आता या सगळ्यानंतर गोविंदाचा भाता कृष्णा अभिषेक याने देखील ट्रोलिंगवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णाने बॉलिवूड लाईफला दिलेल मुलाखतीत सांगितलं की, माझ्यासाठी ते नेहमी ‘हीरो नंबर 1′ राहणार आहेत. सर्वांना गोविंदा आणि कृष्णा यांचा जुना वाद माहिती आहे. मागील वर्षी जेव्हा गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिताने ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये हजेरी लावली. तेव्हा मात्र कृष्णाने शोपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसापसून माम भाच्यामध्ये बोलणं नाही, वाचा-अभिनेत्री समंथाचे हार्ड वर्कआऊट ट्रेनिंग पाहिले का? तुम्हालाही फुटेल घाम गोविंदानं लोहरीनिमित्त रिलीज केलं त्याचं नवं गाणं लोहरीचं निमित्त साधत गोविंदानं यूट्यूबवर ‘मेरे नाल’ या गाण्याचं ऑडिओ शेअर करत म्हटलं आहे की, नमस्कार मित्रानों, मी माझा नवीन ट्रॅक ‘मेरे नाल’ हे गाणं सादर करत आहे. मला आशा आहे की, तुम्हाला हे गाणं आवडेल. आणि हो या गाण्यावर तुम्ही नाचाल याची मला खात्री आहे. गोविंदाचे हॅलो हे गाणे प्रदर्शित होताच या गाण्यातील त्याच्या डान्स स्टाईलमुळे त्याला ट्रोल केले होते. या गाण्यात गोविंदासोबत अभिनेत्री निशा शर्मा डान्स करताना दिसली होती. या गाण्यात गोविंदा त्याच्या ट्रेडमार्क स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतो आहे. मात्र या गाण्यातील त्याची ही जुनी स्टाईल पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. नेटकऱ्यांनी म्हटलं होत की, 90 च्या दशकात नाही तर आपण सध्या 2022 मध्ये आहे. दरम्यान यापूर्वीही या म्युझिक अल्बमद्वारे गोविंदाचे दोन गाणे प्रदर्शित केली आहेत. त्या व्हिडिओलाही लोकांनी म्हणावी पसंती दिली नव्हती. आता त्याचं हे नवीन गाणं प्रेक्षकांना आवडते का हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood, Entertainment

    पुढील बातम्या