सुशांत सिंहचं अर्धवट राहिलेलं स्वप्न होणार पूर्ण; अभिनेत्याच्या टीमने घेतली जबाबदारी

सुशांत सिंहचं अर्धवट राहिलेलं स्वप्न होणार पूर्ण; अभिनेत्याच्या टीमने घेतली जबाबदारी

आपल्या टीमसोबत सुशांतने त्याचं स्वप्न शेअर केलं होतं. आता तो आपल्यात नाहीये, मात्र त्याची स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे

  • Share this:

मुंबई, 17 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. सुशांतनं रविवारी 14 जूनला त्याच्या मुंबईतल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. नेहमीच हसतमुख आणि एनर्जेटिक राहणाऱ्या या अभिनेत्यानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

त्यादरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या टीमने अभिनेत्याची मते आणि कल्पना शेअर करण्यासाठी सेल्फमुसिंग डॉट कॉम  (selfmusing.com) ही वेबसाइट सुरू केली आहे. सेल्फ मुसिंग हे त्याचे स्वप्न होते, अशी माहिती त्याच्या टीमने दिली आहे.

त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन वेबसाइटची लिंक शेअर करताना, टीमने लिहिले आहे - 'तो आमच्यापासून दूर गेला परंतु अद्याप तो आपल्यामध्ये जिवंत आहे. #सेल्फम्युजिंग सुरू करीत आहोत. आपल्यासारखे चाहते सुशांतचे खरे "गॉडफादर" होते. त्याला वचन दिलं होतं त्यानुसार त्याचे सर्व विचार, शिकवण, स्वप्ने आणि इच्छांमध्ये रूपांतर करीत आहे. त्याच्यातील सकारात्मक उर्जा आम्ही येथे येऊन येत आहोत.

मोठी बातमी: सुशांत सिंह राजपूतबाबत कमाल खान लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट!

14 जून रोजी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. त्यावर 15 जून रोजी मुंबईतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या आवडत्या कलाकाराला, मित्राला अलविदा करण्यासाठी बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.

हे वाचा-VIDEO : जिया खाननं 7 वर्षांपूर्वी केली आत्महत्या, आईनं सलमानवर लावले गंभीर आरोप

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

First published: June 17, 2020, 8:16 PM IST

ताज्या बातम्या