सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली भावना, म्हणाले...

सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली भावना, म्हणाले...

सुशांत सिंह अवघ्या 34 वर्षांचा होता, असे काय झाले की त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

  • Share this:

मुंबई, 14 जून : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत (bollywoord actor Sushant Singh Rajput) याने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मीडिया रिपोर्टनुसार त्याच्या घरात काम करणाऱ्याने सुशांतचा मृतदेह पंखाला लटकलेला पाहिला आणि त्याने पोलिसांना कळविले. सुशांत सिंगच्या मृत्यूच्या आलेल्या या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

अजूनही त्याच्या मृत्यूवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. सुशांत सिंह अवघ्या 34 वर्षांचा होता, अशा वयात असे काय झाले की त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. त्याच्या आत्महत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वांसाठीच हा मोठा धक्का आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की सर्वांसाठी हा मोठा धक्का आहे. त्याच्या टीव्ही आणि चित्रपटांतील कामामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्याच्या पश्चात त्याने केलेलं दर्जेदार काम शिल्लक राहिल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुशांतच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्याशिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत आपली भावना व्यक्त केली.

हे वाचा-सुशांत सिंह ब्रेकअप नंतर खचला होता; गर्लफ्रेंडपासून या कारणाने झाला होता वेगळा

First published: June 14, 2020, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading