मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

‘तू असं का केलंस?’, सुशांतच्या आत्महत्येच्या धक्क्यानं घरातील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

‘तू असं का केलंस?’, सुशांतच्या आत्महत्येच्या धक्क्यानं घरातील आणखी एका व्यक्तीचा मृत्यू

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता दोन दिवसातच कुटुंबाला दुसरा झटका बसला आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता दोन दिवसातच कुटुंबाला दुसरा झटका बसला आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता दोन दिवसातच कुटुंबाला दुसरा झटका बसला आहे.

    पटना, 16 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अकाली मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसला. अजूनही सुशांतनं आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. सुशांतचे गाव बिहारमधील पुर्णिया येथे आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. आता दोन दिवसातच कुटुंबाला दुसरा झटका बसला आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या धक्क्यानं त्याची वहिनी सुधा देवी यांचेही निधन झालं. सुशांत गेल्याचं दु:ख सुधा देवी पचवू शकल्या नाहीत, असं म्हटलं जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, सुधा देवी यांचे निधन बिहारमधील त्यांच्या घरी पुर्णिया येथे झाले आहे. मुंबईमध्ये सुशांतवर अंतिम संस्कार सुरू असतानाच सुधा देवी यांनी अखेरचा श्वास घेतला. सुशांतच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर त्यांनी अन्न पाण्याचा त्याग केला होता. त्या सतत सुशांत तू असं का केलं? असा प्रश्न विचारत होत्या. सुशांतचा मृत्यू सहन न झाल्यानं सुधा देवी यांनी मंगळवारी प्राण सोडले. वाचा-डिसेंबरमध्ये होणार होतं सुशांतचं लग्न, चौकशीनंतर आत्महत्या प्रकरणाला नवं वळण कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार सुधा देवी आजारी होत्या. रविवारी (14 जून) सुशांतच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यानंतर त्यांनी अन्न त्याग केला. त्या शुद्धीवरही आल्या नव्हत्या. त्यानंतर सोमवारी (15 जून) सायंकाळी त्याचं निधन झाले. सुधा देवी आणि त्याचे कुटुंब पुर्णिया येथे राहतात. दोन दिवसात घरातील दोन व्यक्ती गेल्यामुळं संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वाचा-लॉकडाऊनमध्ये बॉलिवूडवर नैराश्याचं सावट; सुशांतसह या कलाकारांनी संपवलं जीवन बॉलिवूडमधील नेपोटिझम सुशांतच्या आत्महत्येला कारणीभूत? सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अशा अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्यात ज्यामध्ये नोपेटिझम आणि बॉलिवूडकरांना जबाबदार धरलं जात आहे. सुशांतची आत्महत्या नव्हे तर मर्डर असल्याचं अभिनेत्री कंगणा रणौत (kangana ranaut) म्हणाली आणि तिच्या या प्रतिक्रियेनंतर कुस्तीपटू बबिता फोगटही (babita phogat) व्यक्त झाली आहे. बबिताने करण जोहरचं नाव घेत त्याच्यावर आरोप केले आहेत. "करण जोहर कोण आहे? फिल्म इंडस्ट्री त्याने किती गलिच्छ करून ठेवली आहे. त्याची मक्तेदारी आहे का? फिल्म इंडस्ट्री याला सडेतोड उत्तर का देत नाही? एक आमची वाघीण कंगना रणौतच आहे, जी त्याला उत्तर देते. या गँगच्या सर्व फिल्मवर बहिष्कार टाका" कंगनाच्या टीमनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वाचा-'खूप त्रास होतोय'... या मुलाखतीत सुशांत सिंहने मोकळं केलं होतं आपलं मन
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Sushant Singh Rajput

    पुढील बातम्या