सुशांत-सारासह हृतिक रोशनसोबतची LOVE STORY आठवत भावुक झाली कंगना रनौत

कंगनाने या ट्विटमध्ये ऋतिकसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे

कंगनाने या ट्विटमध्ये ऋतिकसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे

  • Share this:
    मुंबई, 20 ऑगस्ट : सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूनंतर सुशांतच्या भूतकाळातील अनेक गोष्टींवर जोरदार चर्चा सुरू आहे. सुशांत आणि साराच्या नात्याबाबत (Relationship between Sushant and Sara) सुशांतचा फ्लॅटमेट सॅम्युअल हाओकिप याने मोठा दावा केला आहे, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर आता सारा आणि सुशांतबाबत बरीच चर्चा सुरू आहे. सारा आणि सुशांतने 'केदारनाथ' चित्रपटात एकत्र काम केलं होते. या चित्रपटादरम्यान दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे वृत्त आले. बॉलिवूडची 'पंगा क्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) ने एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये तिने सुशांत-साराच्या लव स्टोरीचा उल्लेख करीत ऋतिक रोशन (Hrithik Roshan) ची आठवण काढली आहे. सुशांतचा फ्लॅटमेट सॅम्यूअल हावोकिप (Samuel Haokip)ने असा दावा केला आहे की, 'केदारनाथ'च्या दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांतच्या ऑन स्क्रीन लव्ह स्टोरीबरोबर ऑफ स्क्रीन लव्ह स्टोरी देखील सुरू होती. कंगनाने ट्विट केलं आहे. त्यात ती म्हणते की, मला असं वाटतं की साराचं त्याच्यावर प्रेम असेल, सुशांत वेडा होता जो अशा मुलीवर प्रेम करीत होता, जिचं प्रेम सत्यात नव्हतं..मात्र ती दबावाखील असू शकेल...ऋतिक रोशनसोबतचे माझे नाते खरे होते...मला आताही याबाबत काहीच तक्रार नाही..मात्र अचानक तो शत्रूसारखा का वागू लागला, हेदेखील माझ्यासाठी रहस्यचं आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published: