• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Sidharthच्या मृत्यूनंतर Shehnazचा तो व्हिडीओ VIRAL; पाहून चाहत्यांना अश्रू अनावर

Sidharthच्या मृत्यूनंतर Shehnazचा तो व्हिडीओ VIRAL; पाहून चाहत्यांना अश्रू अनावर

अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल यांनी बिग बॉस १३ मध्ये सहभाग घेतला होता. हे दोघेही एकाच पर्वात होते. या घरामध्येच हे दोघेही पहिल्यांदा भेटले होते.

 • Share this:
  मुंबई, 22सप्टेंबर- अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण देश हादरला आहे. आजही सर्वांना या गोष्टीवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. एकीकडे त्याचे चाहते आणि कुटुंबीय या धक्क्यातून सावरले नाही आहेत. तर दुसरीकडे सिद्धार्थवर जीवापाड प्रेम करणारी त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री शेहनाज गिलसुद्धा या दुःखातून सावरली नाहीय. तिला यातून सावरणं कठीण झालं आहे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेहनाज एक इमोशनल गाणं गात असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना अश्रू अनावर होत आहेत. व्हायरल झालेला व्हिडीओ-
  अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शेहनाज गिलचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेहनाज स्वतः इमोशनल दिसून येत आहे.हा व्हिडीओ शेहनाज गिलचा एक जुना इन्स्टाग्राम लाइव्ह आहे. यामध्ये शेहनाज एक पंजाबी गाणं गात आहे. 'रोई ना जे याद मेरी... ' असं हे प्रसिद्ध पंजाबी गाणं आहे. शेहनाजच्या आवाजात हे इमोशनल गाणं ऐकून सर्वांनाच भरून येत आहे. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाजचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना अश्रू अनावर होत आहेत. (हे वाचा:एका चुकीने घेतला ईश्वरी आणि शुभमचा जीव; पुढच्या महिन्यात होता साखरपुडा) अशी जुळली लव्हस्टोरी- अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल यांनी बिग बॉस १३ मध्ये सहभाग घेतला होता. हे दोघेही एकाच पर्वात होते. या घरामध्येच हे दोघेही पहिल्यांदा भेटले होते. बिग बॉसच्या घरात यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. घरामध्ये हे दोघेही नेहमीच एकमेकांची बाजू घेताना दिसून आले होते. तसेच बिग बॉसच्या घरात शेहनाजने वारंवार आपलं सिद्धार्थवर किती प्रेम आहे हे दाखवून दिलं होतं. तर सिद्धार्थनेहि आपलं आणि शेहनाजचं नातं खास असल्याचं सांगितलं होत. तसेच आपलं शेहनाजशी एक वेगळंच बॉन्डिंग असल्याचं स्पष्ट केलं होतं. येथूनच यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. घरातून बाहेर आल्यानंतरही हे दोघे एकत्रच होते. (हे वाचा:नाका-तोंडात गेलं होतं पाणी; कार लॉकने घेतलं ईश्वरी-शुभमचं प्राण) चाहत्यांना होतेय शेहनाजची चिंता- सिद्धार्थ शुक्लाच्या अशा आकस्मिक निधनाचा जबरदस्त धक्का शेहनाजला बसला आहे. तिला अजूनही सिद्धार्थ आपल्यातून निघून गेला आहे या गोष्टीवर विश्वास बसत नाहीय. त्याच्या मृत्यनंतर शेहनाजचे जे फोटो समोर आले होते, त्यामध्ये तिची फारच वाईट अवस्था दिसून आली होती. तसेच अशा बातम्या समोर आल्या होत्या, शेहनाजने जेवण सोडलं आहे. त्यामुळे तिला ग्लुकोज चढवावं लागत आहे. या सर्व प्रकारानंतर चाहत्यांना शेहनाजची फार काळजी लागून राहिली आहे. सर्व चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: