मुंबई, १० सप्टेंबर- अभिनेता सिद्धार्थ शुक्लच्या(Sidharth Shukla) अचानक झालेल्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अवघ्या ४० व्हा वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला यावर अजूनही विश्वास ठेवणं शक्य नाहीय. एकीकडे सिद्धार्थचे चाहते दुःखात आहेत. तर दुसरीकडे त्याच्या कुटुंबीयांची अवस्था वाईट आहे. सिद्धार्थची गर्लफ्रेंड म्हटली जाणारी शेहनाजसुद्धा (Shehnaz Gill) अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. त्यामुळे सर्वांनाचा तिची चिंता लागून राहिली आहे.
Found this on insta🙌✨#ShehnaazGiIl #ShehnaazKaurGill pic.twitter.com/TSOVGOMRrY
— Shehnaaz_ki_updates (@SanaKiUpdate) September 9, 2021
सध्या सोशल मीडियावर एक चर्चा सुरु आहे.यामध्ये असं म्हटलं जात आहे, कि शेहनाजला ग्लुकोजवर ठेवलं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सिडनाजच्या चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. फक्त एकदा शेहनाजची तब्ब्येत जाणून घेण्यासाठी हे लोक धडपडत आहेत. मात्र शेहनाजबाबत एक अपडेट नुकताच समोर आली आहे.
(हे वाचा:इतक्यात सिद्धार्थचं दुःख विसरलं'; डान्स VIDEO मुळे राखी सावंत होतेय ट्रोल)
नुकताच शेहनाजच्या एका फॅन पेजवर एका फॅनने एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेहनाजची डिझायनर केन फर्न्ससोबतच्या चॅटचा आहे. यामध्ये असं विचारण्यात आलं होतं, कि लोक म्हणत आहेत सना (शेहनाज)ग्लुकोजवर आहे. हे खरं आहे का? मला माहिती आहे, तुम्ही तिची खूप काळजी घेत आहेत. मात्र तरीसुद्धा म्हणेन सनाची काळजी घ्या. आणि तिची तब्ब्येत ठीक असेल तर कृपा करून या मेसेवर एकदा रिऍक्ट करा. असं या चॅटमध्ये बोलण्यात आलं आहे.
(हे वाचा:सिद्धार्थ - प्रत्युषाच नाही तर 'या' TV स्टार्सनीही कमी वयातच घेतला जगाचा निरोप)
या मॅसेजसना उत्तर देत केननं म्हटलं आहे, नाही ती ग्लूकोजवर नाहीय. सुरुवातीला तिने दोन दिवस अजिबात जेवण घेतलं नव्हतं. त्यामुळे त्यावेळी तिला ग्लूकोज चढवावं लागलं होता. मात्र आत्ता नाही. हे वाचून चाहत्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sidharth shukla