मुंबई, 19 मे : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत आहेत. मागच्या 1 वर्षापासून जीवघेण्या आजाराशी झगडत असलेल्या ऋषी कपूर यांची बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी भेट घेतली. आता पर्यंत प्रियांका चोप्रा ते शाहरुख खान अशा सर्वांनीच ऋषी कपूर यांची भेट घेत त्यांची विचारपूस केली. या सर्व भेटींचे फोटो नीतू कपूर यांनी अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर आता भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी हे देखील ऋषी कपूर यांना न्यूयॉर्कमध्ये भेटले.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या भेटीचे फोटो नीतू कपूर यांनी सोशल मीडिया शेअर केले. या फोटोमध्ये नीता आणि मुकेश अंबानी ऋषी कपूर आणि नीतू यांच्यासोबत दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना नीतू कपूर यांनी मुकेश आणि नीता अंबानींचे आभार मानले. या फोटोवर ऋषी आणि नीतू कपूर यांचे चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रियांमधून व्यक्त होत आहेत. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड किंग शाहरुख खान हा सुद्धा ऋषी कपूर यांना भेटायला न्ययॉर्कला गेला होता. या भेटीचाही फोटो नीतू यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला होता.
शाहरुख खानसोबतचा सेल्फी शेअर करताना नीतू कपूर यांनी लिहिलं, 'लोकांना आनंद देणं हा माणसातील दुर्मिळ गुण आहे पण हा गुण शाहरुखकडे आहे. लोकांवर प्रेम करण्याचा आणि त्यांची काळजी घेण्याचा त्याचा अंदाज इतरांपेक्षा खूपच वेगळा आहे. कामात परफेक्ट असणारा शाहरुख मनाचा खरा माणूस आहे.' शाहरुख खाननं त्याच्या करिअरची सुरुवात ऋषी कपूर यांच्या सोबत केली होती.
अंबानी परिवार आणि शाहरुख खानच्या अगोदर विकी कौशल, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, अनुपम खेर या बॉलिवूड कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. रणबीरची बहीण रिद्धीमा कपूरनं दीपिकाला भेटवस्तूही दिली होती ज्याचा फोटो दीपिकानं इन्स्टाग्नाम स्टोरीवर पोस्ट केली होती.
अभिनेता फरहान होतोय सोशल मीडियावर ट्रोल, युजर म्हणाले- 'ओ अफिम वाले चाचा'
मलायकाशी लग्न करण्यावर अर्जुनचा नवा खुलासा, म्हणाला करेन तर...