मुंबई, 6 जुलै : सध्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका खूपच लोकप्रिय आहे. डाॅ. अमोल कोल्हे यांची निर्मिती संस्था जगदंब क्रिएशननं या मालिकेतून जिवंत इतिहास उभा केला. या मालिकेमुळेच अनेकांना नव्यानं इतिहासाची गोडी लागली. आता जगदंब क्रिएशन नवी मालिका घेऊन येतेय. ती आहे स्वराज्यजननी जिजामाता.
सोनी मराठीवर ही मालिका सुरू होतेय 19 आॅगस्टपासून. जिजाऊंचा इतिहास या मालिकेतून आपल्या समोर येतोय. जिजाऊंची भूमिका अमृता पवार साकारतेय.
'यात तर 20 लोकांचे कपडे होतील', कॉमेडियनने उडवली निया शर्माच्या ड्रेसची थट्टा
अमृतानं या आधी स्टार प्रवाहच्या दुहेरीमध्ये काम केलं होतं. तिनं यात नेहा व्यक्तिरेखा साकारलीय. या मालिकेचे 569 भाग झाले होते. ललित 205 मालिकेत तिनं भैरवीची भूमिका साकारली. आता जिजाऊंच्या तरुणपणीची भूमिका अमृता साकारतेय. ऐतिहासिक मालिकेचं आव्हान तिनं पेललंय.
रणवीर सिंगच्या पहिल्या ऑडिशनचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?
जगदंब प्राॅडक्शनमधल्या एका सहकाऱ्यानं सांगितलं, शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर येतंय. सोनी मराठीच्या माध्यमातून हे शक्य होत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल!
‘साहो’च्या कलेक्शनचा मार्ग कठीण, एकाच दिवशी रिलीज होणार 'हे' तीन बिग बजेट सिनेमे
जिजाऊंवरच्या या मालिकेत शिवाजी महाराजांच्या जन्माआधीपासूनचा इतिहास पाहायला मिळेल. सध्या मालिकेचं शूटिंग जोरात सुरू आहे.
दरम्यान, सगळे प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पहात होते, तो क्षण या आठवड्यात छोट्या पडद्यावर येणार. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत आतापर्यंत अनाजी पंतांच्या सर्व कारवाया समोर आल्यात. अनाजी पंत आणि मंत्रिमंडळानं रायगडावरून पळ काढलाय. त्यांना पकडायला सैन्य निघालं पकडायला वेळ लागला खरा, पण सगळे पकडले गेले.
संभाजी महाराज रायगडावर पोचलेत. सोयरा मातोश्रींसमोर त्यांनी आपला सगळा राग व्यक्त केला. या कारस्थानाला कळत नकळत मातोश्रींचा हातभार लागला होता, याची जाणीवही शंभूराजेंना झालीय. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत इतिहासच समोर उभा राहतो. या आठवड्यात अनाजी पंत आणि सर्व कारभाऱ्यांना शंभूराजेंसमोर उभं केलं जातं. आणि प्रेक्षक ज्याची वाट पहात होते, ते या आठवड्यात घडतं. अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली द्या, असं फर्मान या आठवड्यात निघणार आहे.
EXCLUSIVE VIDEO: शिवानी सुर्वे वाईल्ड कार्डवर बिग बॉसमध्ये परतणार?