डाॅ. अमोल कोल्हे घेऊन येतायत नवी मालिका, जिजाऊंचं चरित्र उलगडणार

डाॅ. अमोल कोल्हे घेऊन येतायत नवी मालिका, जिजाऊंचं चरित्र उलगडणार

Dr. Amol Kolhe, Jijamata, Serial - डाॅ. अमोल कोल्हे आता स्वराज्यजननी जिजामाता ही मालिका घेऊन येतायत

  • Share this:

मुंबई, 10 जुलै : सध्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका खूपच लोकप्रिय आहे. डाॅ. अमोल कोल्हे यांची निर्मिती संस्था जगदंब क्रिएशननं या मालिकेतून जिवंत इतिहास उभा केला. या मालिकेमुळेच अनेकांना नव्यानं इतिहासाची गोडी लागली. आता जगदंब क्रिएशन नवी मालिका घेऊन येतेय. ती आहे स्वराज्यजननी जिजामाता.

सोनी मराठीवर ही मालिका सुरू होतेय 19 ऑगस्टपासून. जिजाऊंचा इतिहास या मालिकेतून आपल्या समोर येतोय. जिजाऊंची भूमिका अमृता पवार साकारतेय.

(... आणि भरत जाधव,अंकुश चौधरीला अश्रू आवरेनात)

अमृतानं या आधी स्टार प्रवाहच्या दुहेरीमध्ये काम केलं होतं. तिनं यात नेहा व्यक्तिरेखा साकारलीय. या मालिकेचे 569 भाग झाले होते. ललित 205 मालिकेत तिनं भैरवीची भूमिका साकारली. आता जिजाऊंच्या तरुणपणीची भूमिका अमृता साकारतेय. ऐतिहासिक मालिकेचं आव्हान तिनं पेललंय.

जगदंब प्राॅडक्शनमधल्या एका सहकाऱ्यानं सांगितलं, शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर येतंय. सोनी मराठीच्या माध्यमातून हे शक्य होत आहे ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही! ही मालिका केवळ मनोरंजन नाही तर संस्कार असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल!

(World Cup Semi Final : अमिताभ बच्चन यांचा हा व्हिडिओही होतोय व्हायरल)

जिजाऊंवरच्या या मालिकेत शिवाजी महाराजांच्या जन्माआधीपासूनचा इतिहास पाहायला मिळेल. सध्या मालिकेचं शूटिंग जोरात सुरू आहे.

दरम्यान, सगळे प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पहात होते, तो क्षण या आठवड्यात छोट्या पडद्यावर येणार. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत आतापर्यंत अनाजी पंतांच्या सर्व कारवाया समोर आल्यात. अनाजी पंत आणि मंत्रिमंडळानं रायगडावरून पळ काढलाय. त्यांना पकडायला सैन्य निघालं पकडायला वेळ लागला खरा, पण सगळे पकडले गेले.

(Bigg Boss Marathi 2- KVR ग्रुप फुटणार? किशोरी, वीणा मधला वाद असा आला चव्हाट्यावर)

संभाजी महाराज रायगडावर पोचलेत. सोयरा मातोश्रींसमोर त्यांनी आपला सगळा राग व्यक्त केला. या कारस्थानाला कळत नकळत मातोश्रींचा हातभार लागला होता, याची जाणीवही शंभूराजेंना झालीय. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत इतिहासच समोर उभा राहतो. या आठवड्यात अनाजी पंत आणि सर्व कारभाऱ्यांना शंभूराजेंसमोर उभं केलं जातं. आणि प्रेक्षक ज्याची वाट पहात होते, ते या आठवड्यात घडतं. अनाजी पंतांना हत्तीच्या पायाखाली द्या, असं फर्मान या आठवड्यात निघणार आहे.

कोब्रा आणि बेडकामध्ये जगण्यासाठी लढाई, VIDEO व्हायरल

First published: July 10, 2019, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading