VIDEO लेक रिद्धिमाने वाहिली वडिलांना श्रद्धांजली, बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूरांच्या अस्थिचं केलं विसर्जन

VIDEO लेक रिद्धिमाने वाहिली वडिलांना श्रद्धांजली, बाणगंगेच्या घाटावर ऋषी कपूरांच्या अस्थिचं केलं विसर्जन

ऋषी कपूर यांची कन्या रिद्धिमा ही दिल्लीत अडकल्याने तिला वडिलांच्या अंत्यसंस्काराला येणं शक्य झालं नव्हतं. अखेर रविवारी तिने अस्थिंचं दर्शन घेतलं

  • Share this:

मुंबई, 3 मे :  लेक रिद्धिमा कपूर मुंबईला पोहोचल्यानंतर ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या निधनानंतरच्या पूजा-विधी केल्या जात आहेत. नीतू कपूर (Nitu Kapoor), मुलगा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि मुलगी रिद्धिमा कपूर (Ridhima Kapoor) यांनी रविवारी बाणगंगा घाटावर ऋषी कपूर यांच्या अस्थीचं विसर्जन केलं. रविवारीच ऋषी कपूर यांची प्रार्थना सभा घेण्यात आली. त्यानंतर आलेल्या एका व्हिडीओमध्ये नीतू, रणबीर आणि रिद्धिमा एका घाटाच्या किनाऱ्यावर पूजा करीत असताना दिसले. तेथे तिघांनीही चेहऱ्यावर मास्क लावला आहे.

ऋषी कपूर यांच्या Prayers Meet चे फोटो शेअर करीत चाहते त्यांच्या लाडक्या कलाकाराल श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. बाणगंगा घाटावरील आलेल्या व्हिडीओनुसार यावेळी रणबीरचा मित्र अयान मुखर्जी आणि आलिया भट्ट येथे उपस्थित होते.

ऋषी कपूर बऱ्याच काळापासून कर्करोगाचा सामना करीत होते. 29 एप्रिल रोजी अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. यावेळी त्यांची मुलगी रिद्धिमा दिल्लीत होती. त्यात त्यांना रस्ते मार्गाने येण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे ती आल्यानंतर पुढील विधी पार पाडण्यात आले.

हे वाचा - फेक मॅसेजवरुन रतन टाटा पुन्हा चिडले, फोटो शेअर करीत व्यक्त केली चिंता

 

First published: May 3, 2020, 10:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading