VIRAL VIDEO : गाण्यानंतर आता रॅम्पवरही रानू मंडलचा जलावा

VIRAL VIDEO : गाण्यानंतर आता रॅम्पवरही रानू मंडलचा जलावा

सध्या रानू मंडल यांचा रॅम्पवॉक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 नोव्हेंबर : मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या रानू मंडल यांचा मेकअपवाला एक फोटो सगळीकडे व्हायरल होत आहे. पण याचीच कमी होती जे आता रानू मंडल रॅम्पवॉक करत असतानाचा एक व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. ज्यामध्ये रानू मंडल प्रियांका चोप्राच्या फॅशन सिनेमातील गाणं ‘जलवा’च्या ठेक्यावर रॅम्पवॉक करताना दिसत आहेत. सध्या रानू मंडल यांचा रॅम्पवॉक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये डिझायनरसोबत शो स्टॉपर रॅम्पवर चालत येत असताना दिसत आहे. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला प्रियांका चोप्राचा सिनेमा फॅशन सिनेमातील जलवा हे गाणं सुरू आहे. यावेळी रानू यांनी पीच कलरचा लहंगा घातला होता. यासोबत त्यांनी हेवी ज्वेलरीसोबत नुक कंप्लिट केला आहे. पण नेटकऱ्यांना मात्र रानू यांच्या हा मेकअप लुक फारसा आवडलेला दिसत नाही. त्यांच्या या लुकवरून सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली जात आहे.

लग्नानंतर 3 महिन्यांनी राखी सावंतनं शेअर केला तिच्या मुलीचा VIDEO, म्हणाली...

रानू मंडल यांनी नुकतीच उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका ब्यूटी पार्लरच्या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी तिथल्या मेकअप आर्टिस्टनं त्यांचा मेकअपही केला होता. पण त्यांचा हा लुक लोकांना काही फारसा आवडला नाही आणि सोशल मीडियावर अक्षरशः मीम्सचा पाऊस पडू लागला. याशिवाय या लुकवर काही मजेदार कमेंट सुद्धा पाहायला मिळत आहेत.

डिलिव्हरीनंतरही HOT दिसतेय अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड, पाहा लेटेस्ट PHOTO

काही दिवसांपूर्वी रानू मंडल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात रानू मंडल त्यांच्यासोब सेल्फी घेण्यासाठी उत्सुक होती मात्र रानू मंडल यांनी तिला नकार देत तिच्याशी रागानं बोलताना दिसल्या. त्यांच्या हा व्हिडीओ व्हायरल होऊन काही काळ लोटला नाही तोवर त्यांच्याशी बोलायला आलेल्या पत्रकार आणि पॅपराजींनाही त्या टाळताना दिसल्या. त्याचं हे वागणं पाहता त्यांना आतापर्यंत मिळालेल्या यशाचा गर्व झाल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या या वागण्यावरही याआधी मीम्स व्हायरल झाले होते.

बॉलिवूडचे 'हे' टॉप सेलिब्रेटी आहेत शुद्ध शाकाहारी!

===============================================================

Published by: Megha Jethe
First published: November 17, 2019, 2:07 PM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या