OMG! राहुल बोसनंतर आणखी एका सेलिब्रेटीला 5 स्टार हॉटेलचा झटका, 3 अंड्यांचं बिल पाहून व्हाल हैराण

OMG! राहुल बोसनंतर आणखी एका सेलिब्रेटीला 5 स्टार हॉटेलचा झटका, 3 अंड्यांचं बिल पाहून व्हाल हैराण

म्युझिक कम्पोझर जोडी विशाल-शेखरचा जोडीदार शेखर रविजानी याला एका हॉटेलच्या बिलामुळे जबरदस्त झटका बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 15 नोव्हेंबर : ‘ऊंची दुकान और फीके पकवान’ ही म्हण तर तुम्ही सर्वांनी ऐकलीच असेल अनेकदा मोठ्या मोठ्या हॉटेल्सची अवस्था अशीच काहीशी असते. या हॉटेल्समध्ये काही गोष्टी जास्तच महागड्या असतात. पण म्युझिक कम्पोझर जोडी विशाल-शेखरचा जोडीदार शेखर रविजानी याला एका हॉटेलच्या बिलामुळे असाच जबरदस्त झटका बसला आहे. खरं तर त्याचं बिल पाहून तुम्हीही हैराण व्हाल. शेखरला एका पंचतारांकित हॉटेलनं फक्त 3 उकडलेल्या अंड्यांसाठी 1672 रुपयांचं बिल दिलं.

शेखर रिवजानीनं त्याच्या या बिलाची माहिती स्वतःच सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, या हॉटेलनं फक्त 3 उकडलेल्या अंड्यांसाठी 1350 रुपये आणि टॅक्ससह 1672 रुपयांचं बिल दिलं आहे. सामान्य व्यक्तीसाठी ही किंमत खरंच हैराण करणारी आहे, पण शेखर सुद्धा हे बिल पाहून चकित झाला आहे. त्यानं या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिलं, 3 अंड्यांच्या सफेद बलकासाठी 1672 रुपये? हे जरा जास्तच महाग खाणं नाही आहे का?

'आई म्हणते शिवी देणं वाईट असतं', स्वरा भास्करनं ट्रोलर्सना सुनावलं

खरं तर सेलिब्रेटीसोबत असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसापूर्वी अभिनेता राहुल बोसला केवळ 2 केळ्यांसाठी 442 रुपयांचं बिल दिलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत राहुलनं माहिती दिली होती. ज्यावरुन वाद झाला आणि नंतर हा वाद इतका वाढला की, त्या हॉटेलला 25 हजार रुपयांचा दंड सुद्धा भरावा लागला होता.

अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण मीरा चोप्राला 5 स्टार हॉटेलच्या नाश्त्यामध्ये अळ्या मिळाल्या होत्या ज्याचा व्हिडीओ तिनं ट्विटरवर शेअर केला होता.

शाहिद कपूर ते आर्यन खान, 'या' भावंडांच्या वयात आहे जास्त अंतर

रानू मंडल आणि हिमेश रेशमियाचं 'हे' नवं गाणं एकदा ऐकाच, YouTube हंगामा

=========================================================

कोळसा खाणीत बिनधास्त फिरतंय अस्वल, पाहा हा VIDEO

First published: November 15, 2019, 11:05 AM IST
Tags: Bollywood

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading