Elec-widget

पुलवामा हल्ल्यानंतर खिलाडी अक्षय कुमारचा मोठा निर्णय, 'केसरी'मधून पाक गायकाची हकालपट्टी

पुलवामा हल्ल्यानंतर खिलाडी अक्षय कुमारचा मोठा निर्णय, 'केसरी'मधून पाक गायकाची हकालपट्टी

पुलवामा हल्ल्यानंतर बॉलिवूडकरांनीही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून अक्षय कुमारच्या केसरीमधून पाक गायकाची हाकलपट्टी करण्यात आली आहे.

  • Share this:

शीखा धारिवाल

मुंबई, 7 मार्च : काश्मीरमधील पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्याचे 40 जवान शहीद झाले. त्यानंतर या हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. या हल्ल्यानंतर बॉलिवूडकरांनीही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. सलमान खानची निर्मिती असलेल्या 'नोटबुक'मधून पाकिस्तानी गायक अतिफ असलमचं गाणं हटवल्यानंतर आता अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातूनही पाकिस्तानी गायकाचं गाणं हटवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटातून पाकिस्तानी गायकाचं एक गाणं हटवल्याचं सांगण्यात येत आहे. पण धर्मा प्रॉडक्शन आणि अक्षय कुमारच्या टीमला याबाबत विचारल्यावर त्यांनी मात्र याविषयी कोणतीही माहिती देण्यास नकार देत याबाबत गप्प राहणंच पसंत केलं.

'केसरी' हा भारतीय जवानांनी अफगाणी सैन्याशी दिलेल्या लढ्याच्या सत्यघटनेवर आधारित युद्धपट आहे. इंग्रजांचा काळ सिनेमात आहे. अक्षय कुमार आणि परिणिती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट येत्या 21 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

वाचा : Kesari Trailer Release- हिंदोस्तान की मिट्टी से डरपोक पैदा होते है.. आज जवाब देने का वक्त आ गया है

Loading...


वाचा :...म्हणून पुलवामाच्या शहीद कुटुंबानं मानले अक्षय कुमारचे आभार


याआधी 21फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या केसरीच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून बॉक्सऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरेल असं वाटतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 7, 2019 01:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...