Home /News /entertainment /

मुनमुननंतर आता राजही संतापला; अफेअरच्या बातम्यांवर म्हणाला, 'माझं आयुष्य...'

मुनमुननंतर आता राजही संतापला; अफेअरच्या बातम्यांवर म्हणाला, 'माझं आयुष्य...'

टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील टप्पू आणि बबिता सध्या फारच चर्चेत आहेत. त्यांच्या अफेअरच्या बातम्या सध्या सगळीकडे पसरत आहेत. पण आता मुनमुन आणि राज यांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत संतापही व्यक्त केला आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई 13 सप्टेंबर : टीव्हीचा लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील टप्पू आणि बबिता सध्या फारच चर्चेत आहेत. त्यांच्या अफेअरच्या बातम्या सध्या सगळीकडे पसरत आहेत. त्यामुळे ते दोघेही फारच चर्चेत आहेत. अभिनेता राज अंदकत (Raj Andakat) आणि मुनमुन दत्ता (Munmun Dutta) यांच्यावर सोशल मीडियातून अनेक लेखही समोर आले. सुरूवातीला दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन धारण केलं होतं, पण आता मुनमुन आणि राज यांनी सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करत संतापही व्यक्त केला आहे. मुनमुन दत्ताने सर्वात आधी यावर प्रतिक्रिया दिली होती. तिने सांगितलं की या प्रकारानंतर तिला भारताची मुलगी असल्याची लाज वाटत आहे, तर मुनमुन नंतर आता राज या संपूर्ण प्रकरणावर बोलला आहे. राजने त्यांच्याविरोधात चुकीचे लिहिणाऱ्यांना संदेश दिला आहे की अशा बातम्यांमुळे त्यांच्या जीवनावरही परिणाम होतो. Video: रणवीर सिंंगचा Game Show देणार नशीब बदलण्याची संधी, प्रोमो आला समोर राज म्हणाला, 'जे कोणी माझ्याबद्दल काहीही लिहित आहेत, फक्त विचार करा की तुमच्या या बनावट कथांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो. माझे मत जाणून न घेता माझ्याबद्दल काहीही लिहित आहात. जे काही सर्जनशील लोक माझ्याबद्दल लिहित आहेत, त्यांची सर्जनशीलता इतरत्र दाखवा. देव त्या लोकांना थोडी समज दे.
  View this post on Instagram

  A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

  याआधी मुनमुनने रविवारी 2 पोस्ट केल्या आणि यावेळी तिने स्वतःसाठी चुकीच्या बातम्या लिहिणाऱ्या लोकांची चांगलीच शाळा घेतली. पहिल्या पोस्टमध्ये मुनमुनने लिहिले, ‘मला तुमच्याकडून आणखी चांगल्या अपेक्षा होत्या.  पण जी काही गलिच्छता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये पसरवली आहे.  त्यातून एकच सिद्ध होतं की तुमच्यासारखे  तथाकथित ‘शिकलेले’ असूनही जे समाजाचा असा भाग आहेत, जो सातत्याने खाली पडत आहे. महिलांना नेहमीच तुमच्या हास्यासाठी त्यांच्या वयावर निशाणा साधला जातो. तुमच्या या मजाकमुळे कोणावर काय ओढवत, हे कोणाला प्रेरित करत की मानसिक रित्या तोडत याची चिंता तुम्हाला कधी नाही झाली. लोकांना मागील 13 वर्षांपासून मनोरंजन करत आहे, पण याच प्रतिमेला धक्का लावायला 13 मिनिट्स देखील लागत नाहीत.’ पुढे तिने लिहिलं की, ‘पुढच्या वेळी जर कोणी तणावात असेल आणि आपलं जीवन संपवण्याचा विचार करत असेल तर थांबून विचार करा तुमचे शब्द त्याला अंताकडे घेऊन जातील की नाही. आज मला स्वतःला भारताची मुलगी म्हणवण्याची लाज वाटत आहे.’
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah

  पुढील बातम्या