Home /News /entertainment /

Good bye Goa... शूटिंग ठप्प झाल्यामुळं अवधूत गुप्तेचा गोव्याला निरोप

Good bye Goa... शूटिंग ठप्प झाल्यामुळं अवधूत गुप्तेचा गोव्याला निरोप

महाराष्ट्रातील शुटींगवर बंदी घातल्यानंतर अनेक मालिकांच शुटींग हे इतर राज्यात हलवण्यात आलं होतं. पण त्यावरही आता बंदी घालण्यात आली आहे.

  मुंबई 7 मे : देशभरात कोरोनाचा (corona virus) प्रकोप सुरू आहे. महराष्ट्रानंतर आता गोवा शासननेही (Goa bans shooting) चित्रिकरणावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातील शुटींगवर बंदी घातल्यानंतर अनेक मालिकांच शुटींग हे इतर राज्यात हलवण्यात आलं होतं. तर बहुतांश हिंदी, मराठी मालिकेंचे सेट हे गोव्यात तयार करण्यात आले व तिथे चित्रिकरण सुरू होते. पण त्यावरही आता बंदी घालण्यात आली आहे. कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनी वरील ‘सूर नवा ध्यास नवा’ (Sur Nava Dhyas Nava) या शोचं शुटींग गोव्यातील मडगाव इथे सुरू होतं. मात्र गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे माजी आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी कडाडून विरोध केला होता.

  ‘खतरों के खिलाडी’ निघाले आफ्रिकेला; कोरोनाशी लढा देत करणार चित्तथरारक स्टंट

  नुकताच त्यांचा शोच्या सेट वरील एक व्हिडिओ देखिल व्हायरल झाला होता. सरदेसाईंनी अचानक या शोच्या सेटवर प्रवेश करत, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला. तेथे बऱ्याच लोकांकडे मास्क नसल्याचे आढळून आले होता. त्याचबरोबर सेटवर सोशल डिस्टन्सिंग नसल्याचंही त्यांनी म्हटल होतं.
  यानंतर आता शुटींग बंद करण्यात आलं आहे. शोच्या निर्मात्यांनी तसेच जजेसने ही सरदेसाईंना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग न झाल्याचं निष्पन्न झालं. तर आता या कार्यक्रमाचं शुटींग थांबवण्यात आलं आहे. गायक तसेच शो चे  परिक्षक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) यांनी गोव्याचा निरोप घेत एक फोटो पोस्ट केला आहे. व ‘गुड वाय गोवा, चांगल्या आठवणी दिल्याबद्दल धन्यवाद’  असं कॅप्शन लिहीलं आहे. याशिवाय गोव्याचे मुख्यमंत्री अरविंद सावंत यांनी सगळ्या प्रकारच्या चित्रिकरणावर बंदी घातली आहे. ‘अग्गबाई सुनबाई’, ‘रंग माझा वेगळा’, ‘पाहिले न मी तुला’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मराठी मालिकेंसह अन्य हिंदी मालिकांचही शुटींग गोव्यात सुरू होतं. परंतु आता शुटींग साठी परवानगी नाकारण्यात आली आहे.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Marathi entertainment, Television show

  पुढील बातम्या