शानने बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना सांगितलं की, “केवळ कलाकारांसाठीच नाही तर उपस्थितांसाठी देखील, जेव्हा जेव्हा प्रेक्षकांची संख्या 300-400 पेक्षा जास्त असेल तेव्हा अपघात होऊ शकतो. तुम्ही खूप परवानग्या घेतलेला असता आणि एक शो करणं महाग असतं.यासर्व गोष्टींदरम्यान रुग्णवाहिका असणं हा प्रक्रियेचा एक भाग आहे."शान पुढे म्हणाला, “आम्ही अनेक शो केले आहेत जिथे प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे गोंधळ माजला होता. पण त्या क्षणी तुम्ही खूप एक्सआयटेड असता – तुमच्यासमोर थेट प्रेक्षक असतात.पण तुम्ही कितीही पैसे दिले तरीही KK एका महिन्यात 8 पेक्षा जास्त शो करत नसे. तो खूप सावध होता." (हे वाचा:हॉलिवूड स्टार जस्टिन बीबरला 'हा' गंभीर आजार, चेहऱ्यावर पॅरालिसिसचा अटॅक ) शान म्हणाला, "इतकी खबरदारी घेतल्यानंतरही हे कोणाच्याही बाबतीत घडते. हे खरंच खूप दुःखद आहे." तो पुढे म्हणाला की, त्याच्या मुलांनी त्यांना हृदय तपासणी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर मी मुंबईला गेलो होतो. शान म्हणाला, “माझी मुलंही आग्रह करत होती, म्हणून मी खास एक दिवसासाठी मुंबईला गेलो आणि हृदय तपासणी करून घेतली.”शान म्हणाला, “मी सर्वांना हे सांगू इच्छितो, विशेषत: ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. तुम्ही जोखीम घेऊ नका आणि दर दोन वर्षांनी हृदय तपासणी करून घ्या. शानने केकेसोबत 'दस बहाने', 'इट्स द टाइम टू डिस्को' सारखी अनेक सुपरहिट गाणी गायिली आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Playback singer