मुंबई 04 सप्टेंबर : बॉलिवूड (Bollywood) कलाकारांना आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं असतं. आताच्या काळात त्यांना सोशल मीडियामुळे बरीच मदत होते. हे कलाकार त्यांची नवी फोटोशूट्स, व्हिडिओ सतत सोशल मीडियामध्ये शेअर करतात आणि आपल्या चाहत्यांचं प्रेम मिळवतात. हे चाहते पण आपल्या लाडक्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. पण जसं या कलाकारांना प्रसिद्धी मिळते तसंच त्यांच्या फोटोंमुळे वादही निर्माण होतात.
अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) हिच्या टॉपलेस फोटोशूटनं (Topless Photoshoot) सोशल मीडियावर खळबळ माजवली होती. बॉलिवूडमधील प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रत्नानी (Dabbu Ratnani) यांच्या दिनदर्शिकेसाठी कियारानं हे फोटोशूट केलं होतं. डब्बू रत्नानीसाठी कियाराच्या आधीही अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी टॉपलेस फोटोशूट केलं आहे. कियारा आडवाणी हिच्या फोटोशूटमुळे या जुन्या फोटोशूट्सनाही उजाळा मिळाला आहे. सोशल मीडियावर या आधीच्या फोटोशूट्सची चर्चा आहे. त्यात बॉलिवूडची आजची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Topless Photoshoot) हिच्या काळ्या रंगाच्या मांजरीच्या आडोशाने केलेल्या टॉपलेस फोटोशूटची जोरदार चर्चा आहे.
झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी असलेल्या आलियाने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केलं आहे. मात्र करिअरच्या सुरुवातीला तिनंही टॉपलेस फोटोशूट केलं होतं.
View this post on Instagram
सुशांतसह बॉलिवूडमध्ये एंट्री करणाऱ्या संजना सांघीचा सुपरकुल लुक;पाहा Bday Photos
साधारण 6-7 वर्षांपूर्वी 2014 मध्ये डब्बू रत्नानीनं आलियाचं एक फोटोशूट केलं होतं. त्यावेळी आलियाने अतिशय बोल्ड लूकमध्ये हे फोटोसेशन केलं होतं. यात आलियाने टॉपलेस फोटोशूट करताना एक काळी मांजर (Black Cat) आपल्या हातात पकडली होती जेणेकरून तिच्या आडोशाने तिच्या शरीराचा वरचा भाग झाकला जाईल. हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट असून या फोटोमध्ये आलियाची परफेक्ट फिगर आणि सौंदर्य खुलून आलेलं दिसतं. ही काळी मांजर आलियाची पाळीव मांजर होती. आलियाने स्वतःच स्वतःला तिच्या 24 व्या वाढदिवसानिमित्त ती भेट दिली होती.
आलियाच्या या फोटोनी तेव्हा सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजवली होती. तिचं सौंदर्य आणि परफेक्ट फिगर बघून चाहते वेडावले होते. या फोटोमुळे आलिया चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली आली होती. तिच्या करिअरला वेग देण्यासाठी हे फोटोशूट अतिशय फायद्याचं ठरलं होतं. आलियाने 2012 मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ दी ईअर’ (Students of The Year) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘हायवे’, ‘टू स्टेट्स’ हे चित्रपट गाजले. 2018 मध्ये आलेला ‘राझी’ (Razi) चित्रपट प्रचंड गाजला. 2019 मध्ये तिचा ‘कलंक’ (Kalank) हा चित्रपट आला होता.
View this post on Instagram
उर्मिला म्हणाली, रंगीला बघितल्यावर मी चाहत्याप्रमाणं आमिर खानला लिहलं होतं पत्र
आता आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) गंगूबाई काठियावाडी चित्रपटात दिसणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ व्यतिरिक्त आलिया एस एस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ मध्येही दिसणार आहे. ती ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये पहिल्यांदा तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) स्क्रीन शेअर करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bold photoshoot