मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

केतकी चितळेनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री वादात, दूध दरवाढीच्या आंदोलनावर केली सडकून टीका

केतकी चितळेनंतर आता बॉलिवूड अभिनेत्री वादात, दूध दरवाढीच्या आंदोलनावर केली सडकून टीका

 सोशल मीडियावरून केतकीवर टीका होत असतानाच बॉलिवूड अभिनेत्रीने घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावरून केतकीवर टीका होत असतानाच बॉलिवूड अभिनेत्रीने घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

सोशल मीडियावरून केतकीवर टीका होत असतानाच बॉलिवूड अभिनेत्रीने घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे.

    मुंबई, 23 जुलै : स्टॅण्डअप कॉमेडियनने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर घेतलेल्या भूमिकेमुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) वादात साडली होती. सोशल मीडियावरून केतकीवर टीका होत असतानाच बॉलिवूड अभिनेत्रीने घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्री आकांक्षा पुरी (Akanksha Puri) हिने दूध दरवाढीसाठी होत असलेल्या आंदोलनातील एका घटनेवर जोरदार टीका केली आहे. लॉकडाऊन काळात दूध दरामध्ये मोठी घसरण झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तर दूध संप पुकारत अनेक ठिकाणी दुधाचे टँकर फोडत दूध विक्री बंद पाडण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अभिनेत्री आकांक्षा पुरी चांगलीच भडकलेली पाहायला मिळाली. आकांक्षा पुरी हिने दूध रस्त्यावर ओतून आदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. टँकरमधून दूध रस्त्यावर ओतलं जात असतानाचा एक व्हिडिओ ट्वीट करत आकांक्षा पुरी हिनं म्हटलं आहे की, 'हे पाहून माझं रक्त खवळलं आहे. आंदोलनाच्या नावाखाली असं दूध वाया घालवणाऱ्यांना लाज वाटायला हवी. लाखो लोक भूकेमुळे मरत असताना हे पाहायला मिळत आहे. असं करणारे लोक मुर्ख आहेत,' अशा शब्दांमध्ये आकांक्षाने आपला संताप व्यक्त केला आहे. आकांक्षा धुरीने आक्रमक शब्दांमध्ये दूध आंदोलकांवर टीका केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण दुधाचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्याने शेतकरी त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर करण्यात येत असलेल्या आंदोलनावर अभिनेत्रीने केलेल्या जहरी टीकेमुळे आकांक्षा पुरी ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Bollywood actress

    पुढील बातम्या