'त्याने त्याच्या पॅंटमधून...', जिया खानच्या बहिणीनंतर शर्लिन चोप्राचाही साजिद खानवर धक्कादायक आरोप

'त्याने त्याच्या पॅंटमधून...', जिया खानच्या बहिणीनंतर शर्लिन चोप्राचाही साजिद खानवर धक्कादायक आरोप

बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood actress) आणि मॉडेल शर्लिन चोप्रानेही (Sherlyn chopra) साजिद खानविषयी (Sajid khan) खळबळजनक खुलासा केला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जानेवारी: दिवंगत अभिनेत्री जिया खानची (Jiah Khan) बहिण करिश्मा खानने बॉलीवूड दिग्दर्शक साजिद खानवर नुकताच लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. आता अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानेही साजिद खानविषयी खळबळजनक खुलासा केला आहे. शर्लिनने ट्विटरवर एकामागून एक अनेक ट्वीट करत, साजिदवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ज्यामध्ये तिने साजिदविषयीची अनेक रहस्ये उघडली आहेत. प्ले बॉय मासिकासाठी न्यूड फोटोशूट केल्यानंतर चर्चेत आलेल्या शर्लिन चोप्राने साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर शर्लिन चोप्राचे ट्वीट प्रचंड व्हायरल होत आहेत.

आता चाहत्यांनीही साजिद खान विरुद्ध मोर्चा उघडल्याचं ट्विटरवर पाहायला मिळत आहे. शर्लिनने साजिदवर आरोप करताना लिहिलं की, - 'एप्रिल 2005 मध्ये माझ्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनी जेव्हा मी साजिदला भेटले. तेव्हा त्यानं त्याच्या पँटमधून प्रायवेट पार्ट काढून मला पकडण्यास सांगितलं. तसेच त्याचा अनुभव घ्यायलाही सांगितलं. त्यावेळी मी त्याला सांगितलं की, मला माहित आहे की पुरुषाचं प्रायवेट पार्ट काय असतो. त्यामुळे तुझ्या या भेटीमागचा माझा उद्देश प्रायवेट पार्ट पकडणं नाहीये.' अशा आशयाचं ट्वीट करत शर्लिनने साजिदवर गंभीर आरोप केले आहेत.

शर्लिनच्या या ट्वीटनंतर ट्वीटरवर बऱ्याच चर्चा रंगत आहेत. काही युजर्सनी त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला. तसेच अजून एका ट्विटर वापरकर्त्यानं म्हटलं की, 'तुम्ही यापूर्वी कधीही अशाप्रकारचा आरोप केला नाही, तुम्ही तक्रार दाखल करायला पाहिजे होती. त्यानं तुमच्याशी गैरवर्तन केलं असताना तुम्ही इतके दिवस शांत का होता? त्याला उत्तर देतान शर्लिन म्हणाली की- 'साजिदकडे असे अनेक सुपरस्टार्स आहेत, जे त्याच्या चारित्र्याबाबत पाठिंबा देवू शकतात. माझे हे शब्द त्यांच्या विरुद्ध आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये माफियांचा एक मोठा गट तयार केला आहे.

बीबीसीच्या ‘डेथ इन बॉलिवूड’या माहितीपटात जिया खानची बहीण करिश्मा खानने साजिदवर हे आरोप केले आहेत. या विषयावर बोलताना करिश्मा खान म्हणाली की, एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान साजिद खानने जियाचा विनयभंग केला होता. एवढंच नाही तर, साजिदने एकदा माझ्यासोबतही असा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी जियाने मला साजिदपासून वाचवलं होतं, असा आरोपही करिश्मा खानने केला आहे.

Published by: News18 Desk
First published: January 19, 2021, 4:53 PM IST

ताज्या बातम्या