मुंबई 29 एप्रिल : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. करण जोहर (Karan Johar) आणि धर्मा प्रॉडक्शनशी झालेल्या विवादानंतर नुकताच तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. या विवादानंतर कार्तिकला ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) या चित्रपटातून बाहेर जाव लागलं होतं. तर आता आणखी एका चित्रपटातून कार्तिकने काढता पाय घेतल्याचं वृत्त समोर येत आहे.
काही दिवसांपूर्वी कार्तिकने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. तर या चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी देखील सुरू झाली होती. परंतु, आता कार्तिकने हा चित्रपट न करण्यचा निर्णय घेतला आहे.
पाहा नोरा फतेहीचा जबरा फॅन; अभिनेत्रीला खुश करण्यासाठी अंगावर काढला टॅटू
एका कॉमिकच्या सुपरहिरोवर आधारित हा चित्रपट होता. दिग्दर्शक वसन बाला या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. 'फँटम' (Fantom) असं चित्रपटाचं नाव असून हा एक सायन्स फिक्शन असलेला चित्रपट आहे. या चित्रपटासाठी सुरुवातीला कार्तिकची निवड करण्यात आली होती. पण आता मात्र कार्तिकने चित्रपटातून माघार घेतली आहे.
View this post on Instagram
एका वृत्तानुसार, बाला यांना ज्या प्रकारचा चित्रपट बनवायचा होता. ती योजना कार्तिकला पटली नाही. कार्तिकला हा सुपरहिरो चित्रपट असल्याने तो वेगळ्या थाटनीचा तसंच बिग बजेट असायला हवा होता. पण बाला यांच्याशी त्याचं मत पटत नव्हतं. क्रिएटिव्ह सोबत असलेल्या या मतभेदामुळे कार्तिकने या चित्रपटाला नकार दिला.
मनोरंजन ते राजकीय क्षेत्र; 'रामायण'च्या ऑनस्क्रिन 'सीता' दीपिका चिखलियांनी साकारली विविध रूपं
याच प्रॉडक्शन सोबत कार्तिक दुसरा चित्रपट करणार आहे. त्यामुळे आता या नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. याशिवाय लवकच तो धमाका या चित्रपटात झळकणार आहे. चित्रपटात तो एका पत्रकाराच्या भूमिकेत दि़सणार आहे. कार्तिकच्या चाहत्यांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.