जॉन अब्राहमनंतर आता 'या' हिरोलाही व्हायचंय विंग कमांडर अभिनंदन

जॉन अब्राहमनंतर आता 'या' हिरोलाही व्हायचंय विंग कमांडर अभिनंदन

भारतीय वायुदल विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी पाकिस्तानाच्या कैदेत असताना दाखवलेल्या धाडसानंतर त्यांच्या शौर्याचा गाथा देशातच नाही तर परदेशातही दूरवर पसरली आहे.

  • Share this:

मुंबई, 8 मार्च : भारतीय वायुदल विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांनी पाकिस्तानाच्या कैदेत असताना दाखवलेल्या धाडसानंतर त्यांच्या शौर्याचा गाथा देशातच नाही तर परदेशातही दूरवर पसरली आहे. पाकिस्तानवर जागतिक स्तरावरील दबाव वाढल्यानंतर तब्बल 60 तासांनंतर अभिनंदन यांची सुटका करण्यात आली होती. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश सलाम करत आहे. यामध्ये बॉलिवूडकरही मागे नाहीयेत. शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यापासून ते किंग शाहरुख खान, सलमान खान, अजय देवगण, अनुपम खैरपर्यंत संपूर्ण बॉलिवूडने सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. तसा विचार करण्यास सिनेनिर्मात्यांकडून सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता रियल लाइफ हिरो अभिनंदन यांची भूमिका मोठ्या पडद्यावर कोण साकारणार? आणि या सिनेमाची निर्मिती कोण करणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच अभिनेता जॉन इब्राहिमनं मोठ्या पडद्यावर अभिनंदन यांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. अभिनंदन यांच्या भूमिकेची ऑफर मिळाल्यास मी स्वतःला भाग्यवान समजेन, असे त्यानं म्हटलं होतं.

जॉननंतर आता खिलाडी अक्षय कुमारलाही अभिनंदन यांची भूमिका साकारायचे असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनंदन यांच्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना अक्षयने म्हटलं की, 'अद्याप मला अभिनंदन यांच्या भूमिकेबद्दल कोणीही विचारलेलं नाही. पण ऑफर आल्यास मला त्यांची भूमिका साकारायला नक्की आवडेल'.

वाचा : विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्ताननं विचारले होते 'हे' प्रश्न आणि दिला होता 'असा' त्रास

First published: March 8, 2019, 10:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading