मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /हिंदुत्वाची तुलना तालिबानशी पडणार महागात; स्वरा भास्कर विरोधात FIR होणार दाखल

हिंदुत्वाची तुलना तालिबानशी पडणार महागात; स्वरा भास्कर विरोधात FIR होणार दाखल

सध्या अफगाणिस्तानात (Afghanistan crisis) घडत असलेल्या परिस्थितीवर भाष्य करत अभिनेत्री स्वरा भास्करने चक्क हिंदुत्वाची तुलना तालिबानशी (Taliban) केली होती.

सध्या अफगाणिस्तानात (Afghanistan crisis) घडत असलेल्या परिस्थितीवर भाष्य करत अभिनेत्री स्वरा भास्करने चक्क हिंदुत्वाची तुलना तालिबानशी (Taliban) केली होती.

सध्या अफगाणिस्तानात (Afghanistan crisis) घडत असलेल्या परिस्थितीवर भाष्य करत अभिनेत्री स्वरा भास्करने चक्क हिंदुत्वाची तुलना तालिबानशी (Taliban) केली होती.

मुंबई 19 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नेहमीच चर्चेत राहते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे तिला नेहमीच ट्रोल केलं जातं. तर तिने नुकतंच एक ट्वीट करत अनेकांना हैराण केलं होतं. सध्या अफगाणिस्तानात (Afghanistan crisis) घडत असलेल्या परिस्थितीवर भाष्य करत तिने चक्क हिंदुत्वाची तुलना तालिबानशी (Taliban) केली होती. त्यानंतर तिच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.

दरम्यान आता स्वराचं हे वक्तव्य तिला महागात पडणार असल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी तिच्या या वक्तव्यासाठी तिला शिक्षा व्हावी असं म्हटलं होतं. तर आता तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला जाणार आहे. दिल्लीतील एक वकील अशोक चैतन्य यांनी दिल्लीतील द्वारका नाथ पोलीस स्थानकात स्वराची तक्रार दाखल केली असून तीच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

विकी कौशल - कतरिनाचा साखरपूडा झाला? मॅनेजिंग टीमने केला असा खुलासा

अशोक यांनी सांगितलं की, ‘मी दिल्लीच्या द्वारकानाथ पोलीस स्थानकात स्वराची प्राथमिक तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण तिने तिच्या ट्वीटमध्ये हिंदूंना हिंदू आतंकवादी म्हटलं आहे.’ (Swara Bhaskar controversial tweets)

ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्राची बॉलिवूड एंट्री? 'या' प्रसिद्ध दिग्दर्शकाने घेतली भेट

49 वर्षीय अशोक चैतन्य इंडियन एअर फोर्समध्ये 15 वर्षे नोकरी केल्यानंतर आता ते वकिली करत आहेत. (FIR on Swara Bhaskar)

'देवमाणूस'चा भाग 2 येणार? मालिकेच्या सक्सेस पार्टीनंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता

स्वरा भास्कर नेहमीच आपल्या बेधडक आणि तितक्याच वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. अनेकदा त्यामुळे तिला ट्रोल ही व्हावं लागत आहे. या आधीही अनेकदा तिच्यावर तीव्र टीका झाली आहे. तिच्या या ट्वीट नंतर #ArrestSwaraBhaskar हा हॅशटॅग देखील ट्रेंड होत होता.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Swara bhaskar