Home /News /entertainment /

Naga Chaitanya शी घटस्फोटानंतर Bisexual होणार Samantha Prabhu; Philip John साठी घेतला मोठा निर्णय

Naga Chaitanya शी घटस्फोटानंतर Bisexual होणार Samantha Prabhu; Philip John साठी घेतला मोठा निर्णय

समंथा प्रभूने (Samantha prabhu bisexual) आपल्या सोशल मीडियावर आपला हा निर्णय जाहीर केला आहे.

  मुंबई, 26 नोव्हेंबर : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुनचा (Naagarjun) मुलगा नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा प्रभू  (Samanth Ruth Prabhu) यांचा घटस्फोट म्हणजे सर्वांसाठीच मोठा धक्का होता. घटस्फोटानंतर समंथाने आणखी एक मोठा धक्का दिला आहे. समंथा आता बायसेक्शुअल (Samanth Ruth Prabhu become bisexual) होणार आहे. नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर नागार्जुनच्या एक्स सुनेने मोठा निर्णय घेतला आहे. हॉलिवूड दिग्दर्शक फिलिप जॉनसाठी ती आता बायसेक्शुअल होणार आहे. समंथाने स्वतःच आपल्या सोशल मीडियावर ही मोठी घोषणा केली आहे. ज्यामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहे. तर काही जणांनी समंथावर शुभेच्छांचा वर्षावही केला आहे. घटस्फोटानंतर समंथाच्या करिअरला वेग मिळाला आहे. तिने बऱ्याच फिल्म साइन केल्या आहेत. नुकतंच तिने तिच्या एका नव्या प्रोजेक्टबाबत सांगितलं आहे. समंथाला एका हॉलिवूड फिल्मची ऑफर आली आहे.
  समंथाची ही पहिली हॉलिवूड फिल्म आहे. ज्याचं नाव आहे अरेंजमेंट ऑफ लव (Arrangements of Love). बाफ्टा अवॉर्ड विजेते दिग्दर्शक फिलिप जॉन (Philip John) या फिल्मचं दिग्दर्शन करणार आहेत. हे वाचा - अनुष्का शर्माने शेअर केले No Makeup फोटो; पती विराट कोहलीने दिली अशी कमेंट समंथाने पोस्टमध्ये म्हटलं आहे, एक नवं जग. मी 2009 साली ‘ये माया चेसावे’साठी शेवटचं ऑडिशन दिलं होतं. 12 वर्षांनी पुन्हा ऑडिशन देताना मला तशीच भीती वाटली. मला वाटतं असं दररोज होत नाही. जेव्हा तुम्ही बाफ्टा पुरस्कार विजेते, समीक्षक ज्यांचं कौतुक करतात आणि तुमची सर्वात आवडती सीरिज डाउटन एबेच्या दिग्दर्शकासाठी ऑडिशन देता. फिलिप सर जेव्हा तुम्ही माझी निवड केली तेव्हा तेव्हा मी आनंदाने उड्याच मारू लागले. या फिल्ममध्ये नागा चैतन्यची एक्स वाइफ वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार समंथा एका बायसेक्शुअल महिलेची भूमिका साकारणार आहे. मजबूत, शार्प माइंड असलेली तामिळ महिला आहे, जी डिटेक्टिव्ह एजन्सी चालवते. हे वाचा -  विकी-कतरिनाचं लग्न होणार की नाही? अभिनेत्याच्या बहिणीनं केला मोठा खुलासा या फिल्ममुळे समंथाच्या करिअरला एक नवी दिशा मिळेल समंथा आता इंडस्ट्रीत तिला हवं तसं काम करण्यासाठी स्वतंत्र आहे. सोशल मीडियावरील चर्चेनुसार अक्किनेनी कुटुंबात असताना समंथाला कधीच पडद्यावर बोल्ड सीन्स देताना पाहिलं नाही. बहुतेक लोक चैतन्यच्या रूढीवादी विचाराला घटस्फोटाचं कारण सांगत आहे. पण या दोघांनीही आपण एकमेकांच्या संमतीनेच वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होतं. आता दोघंही आपाआपल्या कामात व्यस्त आहेत आणि आपलं सिंगल स्टेट एन्जॉय करत आहेत. समंथावर तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Actress, Entertainment, South actress

  पुढील बातम्या