S M L

श्रीदेवी यांच्या ट्विटरवरून बोनी कपूर यांनी केलं ट्विट; पहिल्यांदाच झाले व्यक्त!

यात खासकरून त्यांनी अर्जून कपूर आणि अंशुला कपूर यांचे विशेष आभार मानले आहेत. तुम्ही माझे आधारस्तंभ आहात असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Mar 1, 2018 07:44 AM IST

श्रीदेवी यांच्या ट्विटरवरून बोनी कपूर यांनी केलं ट्विट; पहिल्यांदाच झाले व्यक्त!

01 मार्च : बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर विलेपार्लेतील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याने अवघ्या बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. खास करून कपूर कुटुंबीयावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान या दुखद घटनेनंतर बोनी कपूर पहिल्यांदाच पत्राद्वारे व्यक्त झालेत. त्यांनी श्रीदेवी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एक पत्र लिहलं आहे, आणि त्यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलं आहे.

यात खासकरून त्यांनी अर्जून कपूर आणि अंशुला कपूर यांचे विशेष आभार मानले आहेत. तुम्ही माझे आधारस्तंभ आहात असंही त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. 'संपूर्ण परिवार सध्या दुःखात आहे, या मोठ्या धक्क्याचा सामना करायचा आम्ही प्रयत्न करतोय. माझ्या मुलींना या दुःखातून बाहेर काढणे आणि त्यांची काळजी घेणे, हे माझ्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आह.' असं बोनी म्हणालेत.

बोनी कपूर यांनी पत्रात लिहलं की,

"आम्हाला आधार देणारे माझे कुटुंबीय, माझा मित्र परिवार, सहकारी, हितचिंतक आणि श्रीदेवी यांच्या असंख्य चाहत्यांचा मी आभारी आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो की, अर्जुन आणि अंशुला यांचं प्रेम खुशी, जान्हवी आणि माझ्यासोबत आहे. आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या दु:खद घटनेला सामोरं गेलो.

Loading...
Loading...

अवघ्या जगासाठी श्रीदेवी 'चांदनी' होती. एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. मात्र माझ्यासाठी ती माझी प्रेयसी, माझी मैत्रीण आणि माझ्या मुलींची आई होती. माझ्या मुलींसाठी तर ती सर्वकाही होती. त्यांचं आयुष्य होती. तिच्या भोवतीच आमचं कुटुंब असायचं.

श्रीदेवीला निरोप देताना तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की, आमचं दु:खं आम्हाला वैयक्तिकरित्या व्यक्त करु द्यावं. ती एक अशी अभिनेत्री होती, तिच्या आठवणी आपल्या सगळ्यांकडे आहेत. कोणताच कलावंत पडद्याआड राहत नाही, तो चंदेरी पडद्यावर नेहमी चमकतच राहतो.

माझ्या मुलींचा सांभाळ करणं, हे माझं प्रथम कर्तव्य आहे आणि आता श्रीदेवीशिवाय पुढे जाण्याचा मार्ग शोधायचा आहे. ती आमचं आयुष्य होती, आमची ताकद होती. ती आमच्या हसत राहण्याच कारण होती. आम्ही तिच्यावर खूप प्रेम करतो.

रेस्ट इन पीस, माय लव्ह. आता आमचं आयुष्य पहिल्यासारखं नसणार आहे."

बोनी कपूर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 07:44 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close