Home /News /entertainment /

Sidharth Shukla: तो कुठं असेल तिथं.... सिद्धार्थच्या आईचे ते धीराचे शब्द ऐकून चाहते झाले भावुक

Sidharth Shukla: तो कुठं असेल तिथं.... सिद्धार्थच्या आईचे ते धीराचे शब्द ऐकून चाहते झाले भावुक

Sidharth Shukla :पारस छाबरा हे बिग बॉसचे माजी स्पर्धक आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर ब्रह्माकुमारी सिस्टर्सचा व्हिडिओ शेअर केला आहे.

  मुंबई, 07 सप्टेंबर : लोकप्रिय टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं (Sidharth Shukla) 2 सप्टेंबर 2021 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्याचे चाहते अजूनही सिद्धार्थ कायमचा सोडून गेल्यान दुःखात बुडाले आहेत. अजूनही अनेकजण त्याच्या आठवणी, फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही दिवसापूर्वी सिद्धार्थच्या आई आणि बहिणींनी त्याच्यासाठी एक शोकसभा आयोजित केली होती. या दरम्यानचा ब्रह्माकुमारी सिस्टर शिवानीचा यांचा एक व्हिडिओ प्रार्थना सभेला उपस्थित असलेल्या पारस छाबरा यांनी शेअर केला आहे. पारस छाबरा हे बिग बॉसचे माजी स्पर्धक आहेत. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर ब्रह्माकुमारी सिस्टर्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. सिद्धार्थ शुक्लाच्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर जे सांगितले ते सिस्टर शिवानीने प्रार्थना सभेत सांगितले. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  व्हिडिओमध्ये ब्रह्माकुमारी सिस्टर्स शिवानी म्हणाल्या की, 2 सप्टेंबर रोजी मी रीटा आंटीशी बोललो तेव्हा फक्त मला, ओम शांती असं म्हणाल्या. त्यांच्या त्या एका ओम शांती शब्दामध्ये खूप शक्ती होती. मी विचार करत होतो की त्यांना इतकी ताकद कोठून मिळाली असेल? जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही कशा आहात, तेव्हा त्या म्हणाल्या की, देवाकडे माझी एकच इच्छा आहे, की सिद्धार्थ जिथे असेल तिथे आनंदी राहावा. ही व्हिडिओच्या शेअर करताना, पारस छाबरानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'रीटा आंटी, तुम्हाला दु:खातून सावरण्याची शक्ती मिळू शकेल आणि हे ऐकल्यानंतर मलाही शक्ती मिळाली आहे. या सुंदर सत्संगाबद्दल धन्यवाद. सिद्धार्थचे अनेक चाहते या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका इन्स्टा वापरकर्त्याने लिहिलंय की, रीटा आंटी खूप धैर्यवान आहेत. तर एका दुसऱ्या युजरनं लिहिलंय, पारस भाऊ सिद्धार्थच्या कुटुंबाला साथ द्या. हे वाचा - हैदराबाद बलात्कार प्रकरण; अक्षय कुमार, सलमान खानसह 38 कलाकारांवर अटकेची टांगती तलवार, गुन्हा दाखल दरम्यान, त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शहनाज गिल अजूनही धक्क्यातून सावरू शकलेली नाही. मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार ती नीट झोपत नाही, व्यवस्थित काही खात नाही. ती कुणाशीही बोलत नाही. शहनाजची अशी अवस्था पाहून चाहतेही खूप भावूक झाले आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Sidharth shukla

  पुढील बातम्या