Home /News /entertainment /

'चंद्रमुखी'च्या यशानंतर अमृता खानविलकरनं दिली या ठिकाणाला भेट, Video शेअर करत म्हणाली...

'चंद्रमुखी'च्या यशानंतर अमृता खानविलकरनं दिली या ठिकाणाला भेट, Video शेअर करत म्हणाली...

चंद्रमुखी सिनेमाला मिळालेल्या यशानंतर अमृता खानविलकरने एका खास ठिकाणी भेट दिली आहे. त्याचा व्हिडिओ देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  मुंबई, 23 मे- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर किंवा टेलिव्हिजन सर्वत्र एकच नाव गाजतंय ते म्हणजे चंद्रा आणि फक्त चंद्रा (Chandra). प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शिक आणि विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या कांदबरीवर आधारीत चंद्रमुखी (Chandramukhi Marathi Movie) हा सिनेमा सिनेमागृहात धुमशान घालतोय.अभिनेत्री अमृता खानविलकरनं या सिनेमात चंद्राची भूमिका साकारली आहे. अमृतानं साकारलेल्या चंद्राचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. सिनेमाला मिळालेल्या यशानंतर अमृता खानविलकरने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले आहे. या देवदर्शनाचा व्हिडिओ तिने इन्स्टावर शेअर केला आहे. अमृता खानविलकरनं अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले आहे. या देवदर्शनाचा व्हि़डिओ शेअर करत तिनं म्हटलं आहे की, लहानपणापासून वर्षातून एकदा अक्कलकोट आणि तुळजापूरला यायची सवय आहे. स्वामींनी आणि आईनं खूप दिलंय. चंद्रमुखी release झाला.. promotion च्या गडबडीत राहून गेलं होतं.. आज फक्त आभार मानायला आले. बास बाकी काहीच नाही.  तिच्यासोबत तिच्या आईनं देखील देवाचे दर्शन घेतले आहे.
  लेखक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रसाद ओक याने दिग्दर्शित केला आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहेत. या चित्रपटात दौलत या मुख्य पात्राची भूमिका आदिनाथ कोठारेने साकारली आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर आहे. अजय -अतुल यांचे दमदार संगीत या चित्रपटाला मिळाले आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या