• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • VIDEO : अपघातानंतर अभिनेत्री व कार रेसर मनिषा केळकरची अशी झाली होती अवस्था, बॉडी ट्रान्सफरमेशन पाहून विश्वास बसणार नाही

VIDEO : अपघातानंतर अभिनेत्री व कार रेसर मनिषा केळकरची अशी झाली होती अवस्था, बॉडी ट्रान्सफरमेशन पाहून विश्वास बसणार नाही

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री तसेच फॉर्म्युला फोर कार रेसर मनिषा केळकरच्या कारला अपघात झाला होता. या अपघातामुळे ती गंभीर जखमी झाली होती.

 • Share this:
  मुंबई, 18 नोव्हेंबर- मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत नावारूपाला आलेली प्रसिद्ध अभिनेत्री तसेच फॉर्म्युला फोर कार रेसर मनिषा केळकरच्या  (manisha kelkar )कारला अपघात झाला होता. या अपघातामुळे ती गंभीर जखमी झाली होती. तिला सांगण्यात आलं होत की, आता तू कार रेस, ही गाडी वैगेरे विसर. पण अशा स्थितीमध्ये तिला फिटनेस ट्रेनर अक्षय कदम भेटला आणि आता ती पुन्हा कार रेसिंगसाठी तयार झाली आहे. पण तिचा हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. सोशळ मीडियावर यासंबंधीचा एक व्हिडीओ पोस्ट करत तिनं सांगितलं आहे. मनिषा केळकरने इन्स्टावर नुकताच बॉडी ट्रान्सफरमेशनचा  (manisha kelkars body transformation) व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी तिच्या व्हिडीओला चांगला प्रतिसाद दिला आहे. शिवाय मनीषाच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. मनीषाने कार अपघातावर मात करत अवघ्या पाच महिन्यात बॉडी ट्रान्सफरमेशन केलं आहे. यात मनिषाला तिचा फिटनेस ट्रेनर व आहारतज्ञ 'अक्षय कदम' याने साथ दिली. आज मनिषा जी फिट दिसतेय त्यामागे तिची व तिच्या ट्रेनरची मेहनत दिसतेय. आज पुन्हा ती कार रेस खेळण्यास तयार झाली आहे.
  अभिनेत्री व फॉर्म्युला फोर कार रेसर 'मनिषा केळकर' तिच्या बॉडी ट्रान्सफोरमेशन विषयी सांगते, ''लॉकडाऊनपूर्वी माझा कार अपघात झाला. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की मी आता कार रेसींग करू शकणार नाही. परंतु मी उपचारानंतर फिजीओ थेरपी सुरू केली आणि हळूहळू रिकव्हर झाले. त्यानंतर काही महिन्यांनी मी फिटनेस कोच व न्यूट्रीशनीस्ट अक्षय कदम यांच्या सहाय्याने वर्कआऊट करण्यास सुरूवात केली. मी मोटर स्पोर्ट सुरू केलं तेव्हा मला खूपच अशक्तपणा जाणवत होता. परंतु वर्कआऊटमुळे माझ्यातील मस्सल पावर, स्टॅमिना वाढण्यास मदत झाली. आणि रेसींगसाठी ते फार महत्त्वाचं असतं. त्या कार अपघातामुळे मी फार खचून गेलेले. परंतु व्यायाम, पौष्टीक डायट व सातत्य यामुळे मी आता पुन्हा एकदा कॅमेरासोबत फ्लर्ट करायला व कार रेस करायला देखील तयार झाली आहे. खरंच अपघातावर मात करत मनिषाने स्वत:ला उभं केलं आहे. ती असं देखील म्हणतेय की मनुष्याने कधीच हार मानायला नको नेहमी आशावादी राहिलं पाहिजे. वाचा : 46 व्या वर्षी 'डिंपल गर्ल' बनली आई! प्रीति झिंटाने दिली GOOD NEWS मनिषा केळकरने 'ह्यांचा काही नेम नाही', 'मिशन पॉसिबल', 'चंद्रकोर', 'वंशवेल' असे मराठी सिनेमात काम केले आहे. यासोबतच 'लॉटरी' आणि 'बंदूक' या हिंदी सिनेमांमध्ये देखील तिनं काम केलं आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: