Home /News /entertainment /

12 कोटींच्या मागणीनंतर करीनावर संताप कायम; ‘सीते’ची भूमिका 'या' अभिनेत्रीला देण्याची मागणी

12 कोटींच्या मागणीनंतर करीनावर संताप कायम; ‘सीते’ची भूमिका 'या' अभिनेत्रीला देण्याची मागणी

चित्रपटातील मानधनावरून सुरू झालेला हा वाद आता करीनाच्या बहिष्कारापर्यंत येऊन पोहोचला आहे.

  मुंबई 13 जून : सध्या अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) चांगलीच चर्चेत आली आहे. चित्रपटातील मानधनावरून सुरू झालेला हा वाद आता करीनाच्या बहिष्कारापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे सध्या करीना सध्या चर्चेत आहे. करीनाच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रींची नावही सुचवली जात आहेत. अलौकीक देसाई यांचा ‘रामायण’ (Ramayan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातील ‘सीता’ (Seeta) या भूमिकेसाठी करीना कपूरला विचारण्यात आलं होतं. पण करीनाने तिची फी भलतीच वाढवली असल्याचं समोर आलं. त्यामुळे निर्मातेही पूरते चक्रावून गेले. करीनाने तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे करीनावर मोठी टीका केली जात आहे. करीना ही नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ घरी कुटुंबांसोबत आणि मुलांसोबतच वेळ घालवत आहे. तर आता ती कामालाही सुरुवात करत आहे. करीना तिच्या चित्रपटांसाठी 6 ते 8 कोटी रुपये घेते. पण आता तिने अचानक फी वाढवत 12 कोटी रुपायंची मागणी केली. त्यामुळे #BoycottKareena हा हॅशटॅग देखील ट्रेंड करत होता. याशिवाय करीनावर कायमचा बहिष्कार करण्याची मागणी केली जात होती. तसेच तिच्या जागी नुकतीच विवाहबद्ध झालेली अभिनेत्री यामी गौतमला (Yami Gautam) घ्यावं, असही अनेकांनी सुचवलं. याविषय़ी अनेक ट्वीट्सही करण्यात आले. यामीच्या लग्नाच्या लुकची विशेष चर्चा झाली होती. त्यानंतर अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.

  पल्लवी पाटील ठरली आकर्षक महिला; पाहा मराठमोळ्या अभिनेत्रीचे ग्लॅमरस Photo

  यामीशिवाय अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) आणि अभिनेत्री दीपिका पदूकोनलाही (Deepika Padukone) घेण्याची माणी केली जात आहे. याविषयी अनेक नेटकऱ्यांनी ट्वीट्स करत ही मागणी केली आहे. पण अद्याप करीना किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Entertainment, Kangana ranaut, Kareena Kapoor

  पुढील बातम्या