दोन्ही लेकी कोरोना पॉझिटिव्ह, मुलींनतर बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता COVID-19 च्या विळख्यात

दोन्ही लेकी कोरोना पॉझिटिव्ह, मुलींनतर बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता COVID-19 च्या विळख्यात

काही दिवसांपूर्वी चेन्नई एक्स्प्रेसचे निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शझा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आता करीम मोरानी यांना सुद्धा कोरोना झाल्याची बाब समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 08 एप्रिल : भारतामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 773 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा धोका वाढताना पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कनिका कपूर (Kanika Kapoor) ही एकमेव भारतीय सेलिब्रिटी होती. मात्र त्यानंतर अभिनेता पुरब कोहली आणि त्याच्या कुटुंबीयांचं नाव पुढे आलं. तर काही दिवसांपूर्वी चेन्नई एक्स्प्रेसचे (Chennai Express) निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शझा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. आता करीम मोरानी यांना सुद्धा कोरोना झाल्याची बाब समोर येत आहे. त्यांना नानावटी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.

(हे वाचा-लग्नानंतर दीपिकाच्या या सवयीला वैतागला आहे रणवीर, आई सुद्धा समजावून थकली)

चेन्नई  एक्स्प्रेसचे निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शझा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं सोमवारी समोर आले होते, त्यानंतर त्यांची दुसरी मुलगी अभिनेत्री झोया मोरानी देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं काल समजलं होतं. शझा मार्चच्या पहिल्या आठवड्यात श्रीलंकेहून परतल्याचं समजत आहे तर झोया मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानहून परतली होती.  शझाला नानावटी तर झोयाला कोकिलाबेन रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. शझा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सर्व कुटुंबीयांची कोरोना टेस्ट करण्यात आली. ज्यामध्ये या दोघींचे वडील करीम मोरानी हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आहे. याबाबत स्वत: झोयाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार शझा आणि करीम या दोघांमध्ये कोणतीही लक्षण नसताना ते कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

(हे वाचा-COVID-19 : इटली भारताचा भविष्यकाळ? मुक्त बर्वेने शेअर केला थरकाप उडवणारा VIDEO)

करीम यांनी त्यांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सोसायटीमधील सदस्याना मेसेज पाठवून याबाबत माहिती दिली होती तसंच माफी देखील मागितली होती. मोरानी कुटुंबीयांमध्ये 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने ते ज्याठिकाणी राहतात त्या जुहूमधील भागात चितेचं वातावरण आहे. याठिकाणी अनेक कलाकारांचं देखील वास्तव्य आहे.

संपादन- जान्हवी भाटकर

First published: April 8, 2020, 5:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading