मुंबई, 13 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिक नंतर आता त्यांच्या आयुष्यावर वेबसीरीजचीही बनवली जाणार आहे. 'इरॉस नाऊ'नं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर 'मोदी' ही दहा भागांची वेबसीरीज प्रदर्शित करणार आहे. 'ओह माय गॉड' '102 नॉट आऊट'चे दिग्दर्शक उमेश शुक्ला या वेबसीरीजचं दिग्दर्शन करणार आहेत. येत्या एप्रिलमध्ये ही वेबसीरीज 'इरॉस नाऊ'वर प्रदर्शित केली जाणार आहे. गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान असा नरेंद्र मोदी यांचा प्रवास या वेबसीरीजमधून उलगडला जाणार आहे.
पंतप्रधान मोदींवर बनत आसलेल्या या वेब सीरीजचा फर्स्ट लुक नुकताच समोर आला. चित्रपट समीक्षक आणि व्यापर विश्लेषक तरण आदर्श यांनी या वेब सीरीजचा पहिला लुक ट्विटरवर शेअर करत या वेबसीरीजची घोषणा केली असून यात अभिनेता महेश ठाकूर मोदींच्या भूमिकेत दिसणार आहे. पण मोदींसोबतच्या इतर व्यक्तिरेखा कोण साकारणार हे मात्र अद्याप समजलेलं नाही. या वेब सीरीजचं सर्व शूटिंग गुजरात मध्ये पार पडलं असून यातून मोदींच्या स्वभावातील माहीत नसलेले पैलू उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं मुख्य अभिनेता महेश ठाकूरनं सांगितलं.
Now a 10-part *web series* on PM Narendra Modi... Eros Now and Benchmark Pictures [Umesh Shukla and Ashish Wagh] to produce the biopic... Titled #Modi... Directed by Umesh Shukla [who directed #OhMyGod and #102NotOut]... Premieres in April 2019 on Eros Now... First look poster: pic.twitter.com/a6W0S6VftS
महेश ठाकूरनं याआधी अनेक टीव्ही मालिका तसेच 'आशिकी 2', 'जय हो' सारख्या चित्रपटातही काम केलं आहे. त्यानंतर आता तो वेब सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत आहे. याशिवाय नरेंद्र मोदींवर 'पीएम मोदी' हा बायोपिक बनत असून यात अभिनेता विवेक ओबेरॉय पंतप्रधानांची भूमिका साकारत आहे.