अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थचं असं निघून जाणं सर्वांच्याचं मनाला न पटणारं होतं. इतरांप्रमाणे बिग बॉस 12ची स्पर्धक जसलीन मथारूनेसुद्धा या घटनेचा मोठा धक्का घेतला आहे. त्यामुळे तिची तब्ब्येतदेखील बिघडली आहे. आणि तिला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. (हे वाचा: Sidharth Shuklaला लंडनला जाऊन स्वत:वर करायचे होते उपचार; या सवयीमुळे होता त्रस्त ) जसलीनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये ती रूग्णालयाच्या बेडवर दिसून येत आहे. ती सांगत आहे, ‘सिद्धार्थच्या जाणं अजूनही न पटणारं आहे. मी या घटनेनंतर त्याच्या घरी गेले. शेहनाज आणि सिद्धार्थच्या आईला भेटले. त्यावेळी त्यांची जी अवस्था होती. ते वातावरण इतकं दुखद आणि मनाला चटका लावणारं होतं. की त्यामुळे खूपच अस्वस्थ झाले. मी घरी आल्यानंतरसुद्धा माझ्या नजरेसमोर तेच दृश्य होतं’. (हे वाचा: सिद्धार्थ शुक्लाची आज होणार शोकसभा; चाहत्यांनाही असं होता येईल सहभागी) तसेच ती पुढं सांगते, ‘मी घरी आल्यानंतर मला मोबाईलवर काही मेसेज पाहायला मिळाले. ‘तू सुद्धा मरून जा’ अशा पद्धतीचे ते मेसेज होते. ते पाहून मी खूपच बैचेन झाले. माझ्या आयुष्यात प्रथमचं मी आशा मेसेजमुळे अस्वस्थ झाले. त्यांनतर काय झालं मला कळालंचं नाही मला अचानक 103 डिग्री ताप भरला. माझी तब्ब्येत अशी बिघडली की मला रुग्णालयात दाखल करावं लागलं. तुम्ही आपली काळजी घ्या. आणि प्रार्थना करा की मीसुद्धा लवकरच ठीक होईन’. अशा आशयचा हा व्हिडीओ आहे. सिद्धार्थच्या आकस्मिक निधनाने अनेकांची अवस्था वाईट झाली आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sidharth shukla