मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /तब्बल 6 महिन्यांच्या तपासानंतर राज पर्यंत पोहोचले पोलीस; मुंबई ते लंडन असं चालायचं काम

तब्बल 6 महिन्यांच्या तपासानंतर राज पर्यंत पोहोचले पोलीस; मुंबई ते लंडन असं चालायचं काम

फेब्रुवारी महिन्यातच राज विरोधात तक्रार दाखल झाली होती. मॉडेल्स ना काम देण्याचं लालच दाखवून त्यांना या इंडस्ट्रीत आणल जायचं.

फेब्रुवारी महिन्यातच राज विरोधात तक्रार दाखल झाली होती. मॉडेल्स ना काम देण्याचं लालच दाखवून त्यांना या इंडस्ट्रीत आणल जायचं.

फेब्रुवारी महिन्यातच राज विरोधात तक्रार दाखल झाली होती. मॉडेल्स ना काम देण्याचं लालच दाखवून त्यांना या इंडस्ट्रीत आणल जायचं.

मुंबई 21 जुलै: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती आणि बिझनेसमन राज कुंद्रला (Raj Kundra) सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकच खळबळ माजली आहे. तर पोलिसांना काही सबळ पुरावे देखील मिळाले आहेत. त्यामुळे आता शिल्पाचीही चौकशी होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

दरम्यान फेब्रुवारी महिन्यातच राज विरोधात तक्रार दाखल झाली होती. मुंबई पोलिसांचे ज्वाइंट कमिश्नर मिलिंद भराम्बे (Milind Bharambe) यांनी सांगितलं की, मॉडेल्स ना काम देण्याचं लालच दाखवून त्यांना या इंडस्ट्रीत आणल जायचं. (Raj Kundra arrested)

View this post on Instagram

A post shared by Voompla (@voompla)

Raj Kundra Case: राज कुंद्रा केसमध्ये काय आहे शिल्पा शेट्टीची भूमिका? पोलिसांनी केला महत्त्वाचा खुलासा

पोलिसांनी सांगितल की, फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणाचा तपास सुरू झाला होता. अनेक लोकांचे जवाब देखील नोंदवण्यात आले होते. तपासात समोर आलं की काही लहान कलाकारांना (Small artists) वेब सीरिज, शॉर्ट फिल्ममध्ये काम करण्याचं लालच दिलं जायचं. त्यानंतर ऑडिशनच्या नावाखाली काही शॉट्स घेतले जायचे. बोल्ड सीन्स द्यावे लागतील सांगितल जायचं. सुरुवातीला सेमी नुड आणि नंतर पूर्ण नुड अशा पद्धतीने शूट केलं जायचं.

View this post on Instagram

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

तपासात समोर आलं की राज कुंद्राची कंपनी वियानच (Viaan company) टायप लंडनच्या एका कंपनीशी आहे. जी राजच्या मेहुण्याचीच आहे. त्याच्या कंपनीचं हॉटशॉट (hotshot) नावाचं ॲप आहे. कंपनी आणि ॲप दोन्ही लंडन मध्ये आहेत मात्र सगळं काम आणि शूटिंग हे मुंबईत चालायचं. तर अपलोडींग हे परदेशातून केलं जायचं. यातील कंटेंट मुळे ॲपल आणि गूगल ने हे ॲप हटवला होत.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Raj kundra, Shilpa shetty