04 मे : 1991मध्ये संजय दत्त आणि पूजा भट्ट यांनी 'सडक' सिनेमा एकत्र केला होता. त्यानंतर त्यांनी कुठलाच सिनेमा केला नव्हता.
1991मध्ये सडक हा हिट सिनेमा होता. संजय आणि पूजाच्या सिनेमांमधला हा सर्वोत्तम सिनेमा मानला जातो. पण नंतर गोष्टी बदलत गेल्या. संजय दत्त कायद्याच्या कचाट्यात सापडला. पूजानं सिनेमा करणं सोडलं.
पण सध्या चर्चा सुरू आहे ती सडकच्या रिमेकची. आणि नुकतीच संजय दत्त-पूजा भट्ट आणि महेश भट्ट एकत्र दिसले. आणि कयास सुरू झाले.
महेश भट्टनी स्वत: सांगितलं की ते सडकच्या सीक्वलवर ते काम करतायत. आणि पूजा भट्ट, संजय दत्तच्या मुलीची भूमिका आलिया भट्ट करण्याची शक्यता आहे.
'सडक'ची कथा वेश्यागृहात विकली गेलेली मुलगी पूजा आणि तिचा प्रेमी संजय दत्त यांच्या आयुष्यावर आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा