S M L

सुभाष घईंनी धरला पुन्हा एकदा 'ताल'

१९९९ मध्ये प्रदर्शित झालेला 'ताल' सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आलाय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 11, 2017 02:15 PM IST

सुभाष घईंनी धरला पुन्हा एकदा 'ताल'

11 एप्रिल : तब्बल 17 वर्षानंतर सुभाष घई यांनी पुन्हा एकदा 'ताल' धरला आहे. १९९९ मध्ये प्रदर्शित झालेला 'ताल' सिनेमा पुन्हा प्रदर्शित करण्यात आलाय. ऐश्वर्या राय, अनिल कपूर, अक्षय खन्ना असे दिग्गज कलाकार असलेल्या सिनेमाचा प्रीमियर मुंबईच्या सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला.

याप्रसंगी दिग्दर्शक सुभाष घई यांची पत्नी मुक्ता, मुलगी मेघना, संगीतकार ए आर रहमान, गायक सुखविंदर, कोरियोग्राफर शामक दावर उपस्थित होते. तसंच ताल सिनेमाच्या संपूर्ण टीमने सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे अनुभवही सांगितले.

सुभाष घई यांना 'ताल' च्या सीक्वलबाबत विचारलं. 'जोपर्यंत 'ताल' च्या दुसऱ्या भागासाठी मला योग्य ती कथा मिळत नाही तोपर्यंत 'ताल' चा दुसरा भाग बनवला जाणार नाही,' असं त्यांनी सांगितलं.

'आता आम्ही ताल सिनेमा तरुण प्रेक्षक वर्गाला दाखवत आहोत. कारण तरुणांनी हा सिनेमा अजून मोठ्या पडद्यावर पाहिलेला नाही. ताल, शोले आणि रंग दे बसंतीसारखे हिट चित्रपट प्रेक्षकांना एक वेगळाच आनंद आणि अनुभव देतात.' असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 02:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close