S M L

दहा वर्षानंतर पुन्हा एकदा बनतेय 'खिचडी'

छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका 'खिचडी' तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.

Sonali Deshpande | Updated On: Oct 31, 2017 01:05 PM IST

दहा वर्षानंतर पुन्हा एकदा बनतेय 'खिचडी'

31 आॅक्टोबर : छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय मालिका 'खिचडी' तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. अनंग देसाई, राजीव मेहता, सुप्रिया पाठक, वंदना पाठक, जमनादास मजीठीया हे कलाकार परत एकदा सगळ्यांनाच खळखळून हसवण्यासाठी सज्ज झालेत. मालिकेची संपूर्ण टीम नव्या उत्साहात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास फारच उत्सुक असल्याचं निर्मात्यांनी म्हटलंय.

मालिकेच्या या नव्या वर्जनमध्ये काही नवे चेहरेही प्रेक्षकांना पाहायला मिळणारेत.आता 'खिचडी'च्या या नव्या पर्वाला प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळतो का हे पाहाचंय.

खिचडी मालिकेतली प्रत्येक व्यक्तिरेखा रंजक आहे. प्रत्येकाची वेगळी खुबी आहे. म्हणून आता या नव्या खिचडीचे नवे संदर्भ पाहायला सगळे उत्सुक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2017 01:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close