Home /News /entertainment /

महिलांबाबत ते वाक्य जेठालाल यांना पडलं होतं भारी; केली जात होती तुरुंगात टाकण्याची मागणी

महिलांबाबत ते वाक्य जेठालाल यांना पडलं होतं भारी; केली जात होती तुरुंगात टाकण्याची मागणी

ते प्रकरण आलं होतं दिलीप जोशींच्या अंगाशी; देशभरातील महिला करत होत्या जोरदार टीका

    मुंबई 26 मे: दिलीप जोशी (Dilip Joshi) हे छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या विनोदी मालिकेतील जेठालाल चंपकलाल गडा (Jethalal Champaklal Gada) या व्यक्तिरेखेनं त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. आज देशभरातील अनेक प्रेक्षक त्यांना त्यांच्या खऱ्या नावा ऐवजी जेठालाल या नावामुळेच ओळखतात. पण हेच जेठालाल एकदा आपल्या एका विनोदी डायलॉगमुळं वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. महिला आयोगानं त्यांच्या घरावर मोर्चा देखील नेला होता. त्यांना अगदी त्राहिभगवान करुन सोडलं होतं. पाहुया कुठला होता तो डायलॉग आणि त्यामुळं नेमकं असं काय झालं? तारक मेहता या मालिकेनं मिळवलेल्या यशात दया बेन आणि जेठालाल यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या जबरदस्त केमिट्रीमुळं सर्वसाधारण विनोदही प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतो. अशाच एका सीनमध्ये जेठालाल आणि दयाबेनचं भांडण दाखवण्यात आलं होतं. यामध्ये जेठालाल दयाबेनवर फारच संतापले होते. अन् रागाच्या भरात ते आपल्या पत्नीला ‘पागल औरत’ म्हणजेच ‘वेडी बाई’ असं म्हणाले.  त्यानंतर दयाबेननं दिलेले एक्सप्रेशन पाहून प्रेक्षक अगदी लोटपोट होऊन हसले. यानंतर ‘पागल औरत’ हा डायलॉग फारच प्रसिद्ध झाला. तारक मेहताचे अनेक मिम्स सोशल मीडियावर चर्चेत असतात. यामधील अनेक ठिकाणी ‘पागल औरत’ हे वाक्य सर्रास वापरलं जाऊ लागलं. पण हा प्रकार देशातील काही महिलांना आवडला नाही. पोरबंदरमधील गरीब मुलगा कसा झाला जेठालाल? पाहा दिलीप जोशींचा प्रेरणादायी प्रवास पागल औरत या वक्याच्या माध्यमातून देशातील महिला वर्गाचा आपमान केला जातोय अशी तक्रार त्यांनी महिला आयोगाकडे केली. त्यांनी देखील याची गांभीर्यानं नोंद घेत दिलीप जोशींवर जोरदार टीका केली. त्यांना तुरुंगात टाका अशी मागणी देखील केली जात होती. सुरुवातीला त्यांनी या टीकेकडे दुर्लक्ष केलं होतं. पण एके दिवशी महिलांचा एक मोर्चाच त्यांच्या घरावर चालून गेला. हा सर्व प्रकार पाहुन ते थोडे घाबरले अन् त्याक्षणी त्यांनी सोशल मीडियाद्वारे सर्वांची माफी मागितली. केवळ विनोद करणं हाच केवळ त्या शब्दामागील हेतू होता. कोणाच्याही भावना यामुळं दुखावल्या गेल्या असतील तर मला माफ करावं यापुढे असा डॉयलॉग मी उच्चारणार नाही असं अश्वासन त्यांनी दिलं. त्यानंतर निर्मात्यांनी देखील तो एडिट करुन टाकला. हा किस्सा दिलीप जोशी यांनी सौरभ पंतला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Taarak mehta ka ooltah chashma

    पुढील बातम्या