मुंबई, 28 मार्च- आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) सध्या त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळं जास्त चर्चेत आहेत. सध्या दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. असं असताना या दोघांच्यासंबंधी एक मोठी बातमी समोर आली आहे. चाहते तर या दोघांच्या लग्नाचं स्वप्न पाहू लागले आहेत. दोघांचं नातं सध्या सगळीत चर्चेत आहे.
सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा बॉलिवूड वर्तुळात चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसात अनन्या आणि आदित्य एकत्र रॅम्प वॉक करताना दिसले होते. यानंतर अशी चर्चा रंगली होती की, दोघांनीही आपलं नातं सर्वांसमोर उघड करण्याचे ठरवलं आहे. असं जरी असलं तरी दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्यावर कसलचं भाष्य केलेलं नाही. असं जरी असलं तरी दोघेही अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होत असतात. मीडिया मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांच्या घरच्यांनी या नात्याला हिरवा कंदील दाखवला आहे म्हणजे परवानगी दिली आहे.
माधुरीची ऐश्वर्यासोबत तुलना; अभिनेत्यावर चांगल्याच संतापल्या जया बच्चन
आदित्यचं नाव यापूर्वीही अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे.
आदित्यचं नाव सध्या अनन्यासोबत जोडलं गेलं असलं तरी यापूर्वी त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. याआधी आदित्य रॉय कपूरचं नाव त्याचा हिट चित्रपट असलेल्या 'आशिकी 2' च्या आरोही म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबतही जोडलं गेलं आहे. या चित्रपटानंतर दोघांच्या अफेअरच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे डेट करत असल्याचा दावा केला जात आहे. याआधीही चाहत्यांनी या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं आहे. या दोघांच्या प्रेमाची सुरुवात एका पार्टीपासून झाल्याचं सांगितलं जात आहे. अनन्या पांडेसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे संकेतही आदित्यने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लोकांना दिले आहेत.
'आजवर तुम्ही या प्रवासाचे साक्षीदार..' तू चाल पुढं फेम अभिनेत्रीची भावुक पोस्ट
सूत्राने बॉलिवूड लाईफला दिलेल्या माहितीनुसार, 'अनन्या आणि आदित्य एकमेकांबद्दल खूप सीरियस आहेत. या दोघांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या नात्याला हिरवा कंदील म्हणजे परवानगी दिली आहे. आदित्य-अनन्या लवकरच आपल्या नात्याला आणखी एक पाऊल पुढे नेऊ इच्छितात. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याचा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र या दोघांना लग्न करण्याची कसलीच घाई नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. आणि दोघांनाही एकमेकांना वेळ द्यायचा आहे. हे दोघेही लवकरच एकत्र फिरायला जाऊ शकतात. अनन्या आणि आदित्यला या नात्याला आणखी थोडा वेळ द्यायचा आहे. आगामी काळात हे दोघेही जाहीरपणे प्रेमाची कबूली देत लोकांना आश्चर्यचकित करू शकतात.
आदित्यच्या अभिनय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तो 'द नाईट मॅनेजर' या क्राइम-थ्रिलर वेब सीरिजमध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत अनिल कपूरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. लवकरच तो 'गुमराह' या चित्रपटात झळकणार आहे. तर अनन्या पांडे लवकरच ड्रीम गर्ल 2 मध्ये दिसणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment