मुंबई, 04 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता आदित्य पंचोली आणि त्याच्याभोवती असलेले वाद अनेक वर्ष चर्चेत आहेत. बॉलिवूडमघ्ये आदित्यनं प्रामुख्यानं खलनायकाच्या भूमिका साकारल्या होत्या. पण खऱ्या आयुष्यातही तो खलनायकच असल्याचं पाहायला मिळालं आहे. आदित्य पंचोली हा त्याच्या वाईट कामांमुळेच सर्वाधिक चर्चेत राहिला आहे. यात प्रामुख्यानं वाद, रेप केस, बेताल वक्तव्य यांचा समावेश आहे. अभिनेता आज त्याचा 57वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं त्याच्या चर्चेत राहिलेल्या वादांवर नजर टाकूया.
बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत ज्या वेळेस इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगलकरून नाव कमावण्याचा वाटेवर होती तेव्हा तिचं नाव आदित्य पंचोलीबरोबर जोडलं गेलं होतं. दोघे डेट करत होते अशा चर्चा होत्या. कंगनानं एकदा खुलासा केला की, आदित्य तिच्या डोक्यात मारत आणि तिचं शारीरिक शोषण करत. कंगनाच्या या खुलास्यानंतर आदित्यनं कंगनाविरोधात तक्रार दाखल केली होती.
हेही वाचा - 'क्राईम पेट्रोल'मध्ये दाखविण्यात आला श्रद्धा वालकर मर्डर केस? नव्या एपिसोडने खळबळ
दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येवेळी आदित्य पंचोली चर्चेत आला होता. जियाला आत्महत्येस प्रवृत्त करण्यामागे आदित्यचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावेळी आदित्यनं एका महिला पत्रकाराला धक्काबुक्की करत तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला होता. या दरम्यान त्या महिला पत्रकाराला दुखापतही झाली होती.
2013साली आदित्य पंचोलीवर शेजाऱ्यांशी भांडण आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. शेजाऱ्यांकडे सुरू असलेल्या कंस्ट्रक्शनच्या कामावरून हे भांडण झालं होतं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं. ज्यात आदित्य समोरच्या व्यक्तीची कॉलर धरून त्याला मारहाण करत होता.
त्यानंतर आदित्य पंचोली अभिनेत्री पूजा बेदीबरोबर असलेल्या रिलेशनमुळे चर्चेत आला होता. पूजाबरोबर डेट करत असताना त्यानं तिच्या घरी काम करत असलेल्या 15 वर्षीय मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. पण मोलकरणीच्या सहमतीनं सेक्स केल्याचा दावा आदित्यनं केला होता. मात्र काही दिवसात आदित्यवरील आरोप सिद्ध झाला आणि पूजाने त्याच्याबरोबर असलेलं नातं संपवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News