Home /News /entertainment /

शुभमंगल सावधान: आदित्य नारायण अडकला विवाहबंधनात !

शुभमंगल सावधान: आदित्य नारायण अडकला विवाहबंधनात !

गायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण लग्नाच्या (Aditya Narayan) बेडीत अडकला आहे. त्याच्या लग्नात आदित्यचा थाट काही औरच होता.

  मुंबई, 01 डिसेंबर: गायक आणि सूत्रसंचालक आदित्य नारायण (Aditya Narayan) विवाहबंधनात अडकला आहे. मुंबईच्या इस्कॉन टेम्पलमध्ये श्वेता अग्रवालसोबत (Shweta Agrawal) त्याने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. कोरोना व्हायरसमुळे (corona virus) अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा चक्क मंदिरात पार पडला. लग्नाला त्या दोघांचे काही जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. 2 डिसेंबर रोजी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आदित्य आणि श्वेताचं रिशेप्शन आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. आदित्य आणि श्वेतावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नाच्या पोषाखामध्ये आदित्य आणि श्वेता अतिशय सुंदर दिसत होते. त्यांच्या लग्नाचे काही फोटो लीक झाले आहेत. अगदी साध्या पद्धतीने लग्न करणार असं म्हणत असतानाच आदित्यच्या लग्नाचा थाट काही औरच होता.
  आदित्यच्या वरातीचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यात उदित नारायण (Udit Narayan) आणि त्यांची पत्नी नाचताना दिसत आहेत. आदित्य नारायण वराच्या वेशात अतिशय देखणा दिसत होता.
  आदित्य आणि श्वेता दहा वर्षांहून अधिक काळ रिलेशनशीपमध्ये आहेत. ऑक्टोबरमध्ये आदित्यने सोशल मीडियावर आपल्या विवाहाची खबर दिली होती. श्वेताचा फोटो शेअर करून त्याने, ‘आम्ही विवाह करत आहोत. मी भाग्यवान आहे की, मला श्वेतासारखी साथीदार लाभली. 11 वर्षापूर्वी आम्ही भेटलो आणि आता या डिसेंबरमध्ये आम्ही विवाह करत आहोत. लग्नाच्या तयारीसाठी आम्ही सोशल मीडियावरून काही काळ ब्रेक घेत आहोत. डिसेंबरमध्ये भेटू’, अशी पोस्ट केली होती.
  इंडियन आयडॉलच्या एका कार्यक्रमात उदित नारायण आणि त्यांच्या पत्नी दीपा यांनीही हजेरी लावली होती आणि त्यांनी आदित्यचे लग्न नेहा कक्करशी (Nahe Kakkar) करण्याबाबत उल्लेख केला होता. त्यानंतर या दोघांच्या विवाहावरून वेगवेगळ्या चर्चांना ऊत आला होता. नंतर मात्र नेहाने गायक रोहनप्रीतसोबत लग्नगाठ बांधली. आणि आता आदित्यने श्वेताशी लग्न केलं आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Singer, Wedding

  पुढील बातम्या