मुंबई, 05 डिसेंबर: गायक आणि होस्ट आदित्य नारायणचं (aditya narayan) 4 दिवसांपूर्वीच लग्न झालं. त्याने श्वेता अग्रवालशी (shweta agrawal) लग्नाच्या आणाभाका घेतल्या. 2 डिसेंबर रोजी त्यांचं रिसेप्शनही पार पडलं. श्वेता आणि आदित्यचं लग्न मुंबईच्या इस्कॉन टेम्पलमध्ये झालं. यावेळी कोरोनाचे सगळे नियम पाळण्यात आले होते. तसंच काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी अशा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत आदित्य आणि श्वेताचा लग्नसोहळा पार पडला. दरम्यान आदित्य, श्वेता आणि त्याच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आदित्य त्याच्या पत्नीला धमकी देताना दिसत आहे.
हा व्हिडीओ अतिशय मजेशीर आहे. त्याचं झालं असं की, श्वेता अग्रवाल आदित्यच्या आईसोबत किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहे. तिथे उभा असलेला आदित्य जेवणाच्या चवीवरुन तिची मस्करी करतो. आदित्य धमकी देण्याच्या आवेशात श्वेताला म्हणतो, ‘जेवणात काही कसर राहिली तर तुला सासरी पाठवून देऊ’ खरंतर त्याला माहेरी म्हणायचं असतं. हे ऐकून श्वेता हसायला लागते. ती म्हणते, ‘हे तर माझं सासरच आहे. तुला माहेरी म्हणायचं आहे का?’ आणि सगळेच हसायला लागतात.
श्वेता आणि आदित्यचा हा फनी व्हिडीओ त्याच्या बहिणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून आदित्यचे चाहतेही हसत सुटले आहेत. त्यांनी या व्हिडीओला वेगवेगळ्या कॉमेंट्स केल्या आहेत. मीडिया रिपोट्सच्या माहितीनुसार, ‘कोरोना आणि कामामुळे आदित्य आणि श्वेताने हनीमूनला न जाता मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुंबईतच 5BHK चा एक फ्लॅट घेतला आहे. हे कपल लवकरच तिथे राहायला जाणार आहे.’
आदित्यनं आपल्या लग्न सोहळ्याचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले. त्यापैकी एक श्वेता अग्रवालला (shweta agrawal) किस करतानाचा फोटो. आदित्य श्वेताला गालावर किस करताना दिसतो आहे. सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या या फोटोला हजारो लाइक्स आणि शेकडो कॉमेंट्स मिळाले.
आदित्य नारायण रिअॅलिटी-शोचा (reality show) अँकर (anchor) म्हणून किंवा एक उत्तम गायक म्हणून कायमचं चर्चेत असतो. आदित्य नारायण इंडियन आयडॉल (indian idol) या रिअॅलिटी शोचा सूत्रसंचालक होता आणि नेहा कक्कर (neha kakkar) परीक्षक होती. त्यावेळी नेहा आणि आदित्यचा फेक लग्न या शोमध्ये झालं होत. काही महिन्यांपूर्वीच आदित्य आणि नेहाची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर ट्रेंडिंग होती.