Video Viral झाल्यानंतर नेहाशी लग्न करण्याबाबत आदित्य नारायणचा धक्कादायक खुलासा

Video Viral झाल्यानंतर नेहाशी लग्न करण्याबाबत आदित्य नारायणचा धक्कादायक खुलासा

नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाचा व्हिडीओ काही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

  • Share this:

मुंबई, 15 फेब्रुवारी : बॉलिवूडची प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाचा व्हिडीओ काही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात दोघंही सप्तपदी घेताना दिसले होते. मात्र या लग्नाबाबत आदित्य नारायण यानं पहिल्यांदाच खुलासा केला आहे.

नुकत्याच आयबी टाइम्स दिलेल्या मुलाखतीत आदित्य म्हणाला, लग्न हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे. त्यामुळे जेव्हाही मी लग्न करेन तेव्हा त्याची घोषणा स्वतः करेन. माझ्या लग्नाची बातमी कोणापासून लपवणार नाही. नेहा आणि माझ्या लग्नाची गोष्ट ही मस्करीमध्ये सुरू झाली होती. जी लोकांनी गंभीरपणे घेतली. खरं तर हा केवळ शोचा टीआरपी वाढवण्याचा भाग होता.

मलायकाच्या बॉयफ्रेंडबद्दल मुलगा अरहानला काय वाटतं? अभिनेत्रीनं केला खुलासा

 

View this post on Instagram

 

All set for the wedding!!#adityanehakishaadi #AdityaNarayan #NehAditya #NehuWedsAdi #NehaKakkar #indianidol11

A post shared by Neha Aditya (@_nehaaditya_) on

आदित्य पुढे म्हणाला, मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बऱ्याच गोष्ट सुरू आहेत. मात्र कोणताही मीडिया पर्सन आमच्याडे सत्य जाणून घेण्यासाठी आला नाही. हे सर्व फक्त शोचा टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात आलं होतं. शो मेकर्सनी आम्हाला जे करायला सांगितलं ते आम्ही केलं. पण हे सर्व मस्करीत करण्यात आलं होतं.

याआधी बॉलिवूड हंगामा या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आदित्यचे वडील उदित नारायण यांनी  नेहा कक्कर आणि आदित्य यांच्या लग्नाच्या चर्चा फक्त अफवा आहेत असं म्हटलं होतं. हे केवळ इंडियन आयडॉल शोचा टीआरपी वाढवण्यासाठी करण्यात आलं होतं. कारण या शोमध्ये नेहा जज तर आदित्य होस्ट आहे. आदित्य माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. जर नेहासोबत त्याच्या लग्नाच्या चर्चा जर खऱ्या असत्या तर मला नक्की आनंद झाला असता. असं ते म्हणाले होते.

Bigg Boss 13 : फिनालेच्या काही तास आधीच पैसे घेऊन आसिम रियाजनं सोडला शो?

नेहा आणि आदित्यचं गोवा बीच हे नवीन गाणं रिलीज झालं आहे. ज्यात नेहा आणि आदित्यची रोमँटिंक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणं टोनी कक्कर आणि नेहानं गायलं आहे. तसेच या गाण्याच्या लिरिक्स सुद्धा टोनी कक्करच्या आहेत. तर आदित्यचं हे पहिलंच व्हिडीओ साँग आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये नेहा आणि तिची मैत्रिण ‘लुटेरी’ असल्याचं दाखवण्यात आलं आहे. ज्या मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लुटतात. आतापर्यंत हे गाणं 4 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. या गाण्यानं सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

First published: February 15, 2020, 1:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading