मुंबई,28ऑक्टोबर- बॉलीवूडमध्ये (Bolywood) अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या सौंदर्याने लोकांना वेड लावलं आहे. परंतु बॉलीवूड अभिनेत्री आणि राजघराण्यातील सुंदर अदिती राव हैदरी(Aditi Rao Hydari Birthday Today) हिची गोष्टच निराळी आहे. सोशल मीडियावर तिच्या साध्या आणि बोल्ड लूकने इंटरनेटचं तापमान वाढवणारी अदिती आज तिचा ३५ वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपली आवड दाखवल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. आज तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला आदितीच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
View this post on Instagram
आदिती राव हैदरीबद्दल लोकांना माहिती आहे की ती राजा-महाराजांच्या घराण्यातील लेक आहे. तिचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबादच्या राजघराण्यात झाला होता. अदिती आज तिचा 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. अदितीचे पणजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते. याशिवाय, आदिती ही आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची भाची आहे. अदितीचे आजोबा, राजा जे. रामेश्वर राव हे तेलंगणाच्या वनपर्थीवर राज्य करत होते.
View this post on Instagram
आईने केलं संगोपन-
लग्नाच्या दोन वर्षांनी आदितीचे आई आणि वडील दोघेही वेगळे झालेहोते. आदिती तिच्या आईसोबत दिल्लीत राहत होती. आदितीची आई ठुमरी गायिका होती. घटस्फोटानंतर आदितीच्या वडिलांना तिचा ताबा हवा होता. पण अदितीने कधीच आईला सोडले नाही. एका मुलाखतीत तिने खुलासा केला होताहा खुलासा केला होता. अदिती एक ट्रेंड भरतनाट्यम डान्सर आहे.
अदिती ही एक उत्तम अभिनेत्रीसह एक ट्रेंड भरतनाट्यम डान्सर देखील आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून तिने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली होती . आदिती प्रसिद्ध नृत्यांगना लीला सॅमसन यांची शिष्या आहे.
View this post on Instagram
आमिर खानसोबत होतं खास नातं-
अदितीचे काही काळापूर्वी आमिर खानसोबत खास नातं होतं. ती आमिर खानची मेहुणी होती. आमिर खानची माजी (दुसरी) पत्नी किरण राव आणि अदिती या मामे बहिणी आहेत. किरण राजघराण्यातील आहे. किरण राव यांचे आजोबा राजा रामेश्वर राव हे वानापर्थीचे राजा होते. वानापर्थी आता तेलंगणा राज्यात येतं.
(हे वाचा:कोण आहे 'Antim'फेम महिमा मकवाना? सलमान खानच्या चित्रपटातून करतेय बॉलिवूडमध्ये,..)
17व्या वर्षी पडली होती प्रेमात-
अगदी लहान वयातच आदिती प्रेमात पडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयाच्या 17 व्या वर्षी तिने अभिनेता सत्यदीप मिश्राला डेट करायला सुरुवात केली होती. वयाच्या 21 व्या वर्षी तिने 2007 मध्ये अभिनेता सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं होतं. आदितीने हे लग्न काही काळ लोकांपासून लपवून ठेवलं होतं. जरी 2013 मध्ये एका मुलाखतीदरम्यान आदितीने लग्नाची कबुली दिली होती.लग्नानंतर फिल्मी करिअरला सुरुवात झाली होती. 2013 मध्येआदिती आणि सत्यदीप दोघेही वेगळे झाले होते. आदिती आणि सत्यदीप अजूनही चांगले मित्र आहेत. अदितीने 2009 मध्ये 'दिल्ली 6' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तर 2006 मध्ये तिने मल्याळम चित्रपटात काम केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Entertainment