मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'हा सिनेमा मोबाईलवर पाहण्यासाठी...'; Adipurushच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतनं सोडलं मौन

'हा सिनेमा मोबाईलवर पाहण्यासाठी...'; Adipurushच्या ट्रोलिंगवर दिग्दर्शक ओम राऊतनं सोडलं मौन

ओम राऊत

ओम राऊत

आदिपुरूष सिनेमाचा टीझर पाहून सुरू असलेल्या प्रचंड ट्रोलिंगला अखेर सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यानं मौन सोडलं आहे. ओम राऊत काय म्हणाला पाहा.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 04 ऑक्टोबर : ब्रह्मास्त्रनंतर अनेक दिवस प्रेक्षक ज्या सिनेमाची आतूरतेने वाट पाहत होते तो सिनेमा म्हणजे आदिपुरूष.  अखेर सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला मात्र ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी सिनेमाला चांगलंच ट्रोल केलं. रामायणावर आधारित असलेल्या सिनेमाकडून प्रेक्षकांना अनेक अपेक्षा होत्या. मात्र सिनेमातील रामाच्या भूमिकेत असलेल्या प्रभास आणि रावणाच्या भूमिकेत असलेल्या सैफ अली खानला प्रेक्षकांनी चांगलंच ट्रोल केलं. दोघांच्या भूमिका प्रेक्षकांना पटल्यासारखं वाटत नाही.  सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचंड ट्रोलिंगला अखेर सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यानं मौन सोडलं आहे.

नुकताच ब्रम्हास्त्रच्या थ्रीडी टीझरचं स्क्रिनिंग पार पडलं. रविवारी अयोध्येत मोठ्या उत्साहात आदिपुरुषच्या टीझरचं स्क्रिनिंग करण्यात आलं.  या स्क्रिनिंगवेळी ओम राऊतनं मीडियाशी बोलताना  ट्रोलिंगबाबत भाष्य केलं.  ओमनं म्हटलंय, 'सिनेमाचा नुसता ट्रेलर पाहून प्रेक्षक आपली मत मांडण्यासाठी प्रचंड घाई करत आहेत.  आदिपुरूषच्या टीझरवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही', असं ओम राऊत म्हणाला.

हेही वाचा - Devdatta Nage : जय मल्हार ते आदिपुरूष! मराठमोळ्या अभिनेत्याची मोठी झेप

आदिपुरूष सिनेमात वापरण्यात आलेल्या VFX वरुन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरू आहे. सिनेमा नाही अॅनिमेटेड कार्टून असल्याचं म्हटलं जात आहे. या ट्रोलिंगविषयी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ओम राऊत म्हणाला, 'ट्रोलिंग मी थांबवू शकत नाही.  ट्रोलिंगबाबत मला थोड वाईट वाटलं पण मी हैराण झालो नाही. कारण हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तयार करण्यात आला आहे.  मोबाईलच्या स्क्रिनवर पाहण्यासाठी हा सिनेमा नाही. यूट्युबवर टीझर रिलीज न करण्याचा पर्याय असता तर मी नक्कीच युट्यूबवर रिलीज केला नसता पण युट्यूब ही काळाची गरज आहे'.

आदिपुरूष सिनेमावर होणाऱ्या ट्रेलिंगला उत्तर देत ओम पुढे म्हणाला, 'आजच्या पिढीला रामायण फारसं माहिती नाही. प्रत्येक पिढीतील व्यक्तीला रामायणाविषयी माहिती असावी म्हणून मी सिनेमा बनवला आहे. आदिपुरूष हा एनिमेशन सिनेमा नाही. लाइव्ह अँक्शन सीन सिनेमात शुट करण्यात आले आहेत'.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News