Home /News /entertainment /

आदिनाथ उचलतोय नवीन पाऊल; महाराष्ट्राचा मान वाढवत थेट कान्समध्ये फडकवला मराठी झेंडा

आदिनाथ उचलतोय नवीन पाऊल; महाराष्ट्राचा मान वाढवत थेट कान्समध्ये फडकवला मराठी झेंडा

चंद्रमुखीच्या (Chandramukhi) घवघवीत यशानंतर अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आता नव्या इनिंगची सुरवात करायला सज्ज आहे. त्याच्या या प्रोजेक्टबद्दल त्याने एका विडिओद्वारे माहिती दिली.

  मुंबई 22 मे: अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आपल्याला एक हँडसम हंक म्हणून माहित आहे. आदिनाथ त्याच्या फिटनेससोबतच कामाच्या बाबतीतही तेवढाच सजग आहे. सध्या तो कान्स फिल्म फेस्टिव्हलला (Cannes 2022) रवाना झाला असून त्याच्या चाहत्यांना एका विडिओ मार्फत त्याने खास सरप्राईज दिलं आहे. कोठारे व्हीजन्स प्रायव्हेट लिमिटेड अजून एका बॅनरला लाँच करण्याबद्दलची घोषणा आदिनाथने व्हिडिओच्या माध्यमातून केली. स्टोरीटेलर्स नुक्स  (Storyteller's Nook) या बॅनरचं नाव असून यातून नव्याने निर्मिती क्षेत्रात उतरू इच्छिणाऱ्यांना पाठबळ मिळणार आहे.
  आदिनाथने व्हिडिओमध्ये असं सांगितलं, "तुम्ही जर लेखक, दिग्दर्शक असाल किंवा तुमच्याकडे एखादी कल्पना असेल गोष्ट असेल तर ती आमच्याकडे घेऊन या. आम्ही तुम्हाला तुमची गोष्ट मांडण्यासाठी मंच उपलब्ध करून देऊ. आमच्या सहकार्याने तुम्ही निर्मिती क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकू शकता. या नव्या बॅनरचा उपयोग करून जास्तीत जास्त कलाकारांना एकत्र आणून त्यांना प्रोत्साहन देणं, नव्या विषयांना प्रोत्साहन देणं हाच हेतू आहे." एसएनपीएल बॅनरच्या खाली येणारी पहिली कलाकृती 'बेनं' ही फिचर फिल्म असणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन नितीन दीक्षित यांनी केलं आहे. नॅशनल फिल्म डिपार्टमेंट कॉर्पोरेशनने या चित्रपटाची इंटरनॅशनल को-प्रोडक्शन मार्केट कान्स इथे निवड केली आहे. या निवडीमुळे आता आंतराष्ट्रीय पातळीवरील निर्माते सुद्धा या चित्रपटामध्ये पैसे लावू शकतील. आदिनाथने दिलेल्या माहितीनुसार तिथल्या निर्मात्यांशी रीतसर चर्चा करून इच्छित लोकांना या प्रोजेक्टचा भाग होता येईल. कान्सला हजेरी लावणाऱ्या अभिनेत्यांमध्ये आता आदिनाथचं नाव घेतलं जात आहे. त्याने मराठमोळा झेंडा थेट फ्रांसमध्ये फडकवत सगळ्यांना अभिमान वाटेल अशी गोष्ट केली आहे. हेही वाचा- HBD: 22 वर्षाची झाली शाहरुखची लेक, आई गौरीने शेअर केला सुहानाचा Unseen Photo आदिनाथने बऱ्याच गॅपनंतर चंद्रमुखी (Chandramukhi) चित्रपटातून दमदार एंट्री केली. चंद्र्मुखीसोबतच प्रेमात अडकलेला दौलत देशमाने सगळ्यांना खूप जास्त भावला. त्याचं होम प्रोडक्शन असलेल्या कोठारे व्हिजन्सच्या पुढच्या इनिंगमध्ये आदिनाथ सशक्तपणे काम करताना दिसत आहे. त्याच्या खाजगी आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. तो आणि उर्मिला आता एकत्र नाहीत का अशी शंका त्याच्या चाहत्यांना आली होती. मात्र त्याने सगळ्या शंका कुशंका दूर करत त्याच्यात आणि उर्मिलामध्ये सर्व काही आलबेल आहे अशी माहिती दिली होती.
  Published by:Rasika Nanal
  First published:

  Tags: Marathi cinema, Marathi entertainment

  पुढील बातम्या